अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००९बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

नुसताच चाळलाय, आता रात्र रात्र जागुन वाचावं लागेल,
जस जस वाचणार, तसं तसं प्रतिक्रिया देणार.

टण्या गड आला पण सिंह गेला जबरी जमलय.
लयी हसलो. हसुन हसुन डोळ्यातुन पाणी आल. :)

मंजु दिगुलीला भारीच की. :)

रंग तरंग मधील तीन्ही कलाकारांचे अभिनंदन !!!
खूपच मस्त !!! झक्कास !!! दुसरा शब्द नाही...

उत्तम अंक. संबंधितांचे अभिनंदन ... :)

वॅळ डॉणॅ

अजुनतरी फक्त टण्याचा गड वाचलाय. भन्नाट. अजुन त्याचं भूत उतरत नाहीये, नेहमीप्रमाणे टण्या रॉकिंग. बाकिईचं वाचुन मग सांगेन. मला ह्यावेळी काहीच चित्र देता आली नाहीत ह्याचा खूप खेद वाटतोय :-( तरी त्यातुन गडासाठी केलेल्या रेखाटनाची बर्‍याच जणांनी दखल घेतलीय, बरं वाटलं. श्रेय नामावली कुठे आहे? ह्या अंकासाठी कुणी कुणी मेहनत घेतली ह्याची मला उत्कंठा आहे

श्रेय नामावली सापडली. सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि आभार, इतका सुंदर लेख सादर केल्याबद्दल :-)

स्मिता वरचा लेख मनाला भावला..टुलिप अप्रतिम

आयला टण्या, मिरजेचा काय तू?
च्यायला हसून हसून वाट लागली बग पार! लई भारी लिवलायस राव!
(प्रकाश नारायण संतांच्या गंपूची आठवण झाली वाचताना!)

काशीकर मंगल, बोळ, जुळणी कट्टा .. नक्की मिरजेचा आनि विद्यामंदीर प्रशाला असनार!

अंक एकदम मस्त असणार आता उरलेला वाचनारंच!
हॅपी दिवाळी !

अरुणीता, अनुमोदन! स्मिता पाटील अगदी लहानपणापासून आवडत असल्याने खुपच छान माहिती मिळाली. ट्युलीप, शतश धन्यवाद!

प्रकाश नारायण संतांच्या गंपूची आठवण झाली वाचताना >>>> तो लंपन आहे माझ्या मते. :-)

अजुन पुर्ण अंक वाछला नाहि. मुखपृष्ठ अतिशय उताम.. नीलुताईला क्रेडीट. :)
भ्रमा, तुझा लेख अतिशय सुंदर पण एक जळजळीत सत्य... :) जसं पहिल्यादिवशी सगळ्यात पहिला चिराटं फोडतात आणि त्याची चव घेतात तसाच कानउघाडणी करणारा लेख... खुप सुंदर आणि आभार आमचे बोलणे मनावर घेतलेस म्हणुन... :)

बाकिचे सगळे लेख वाचल्यावर प्रतिक्रिया.. :)
संपादक मंडळ - अनेक आभार!

करेक्ट! आदी आटवतंच न्हवतं नाव आनि नंतर बी चुकीचीच ट्युब पेटली बगा! त्ये वायर बरोबर जोडुन देल्याबद्दल धन्यवाद बर का भ्रमर विहार!

कसचं कसचं उपासक! :-)

ह्यावेळी सगळ्यात आवडलेला विभाग म्हणजे प्रिय अमुचा... मस्त जमला आहे! :)
दृकश्राव्य विभाग मात्र मला ह्या वेळी बघता येणार नाही इतक्यात तरी! त्याबद्दल... :(
इतर वाचनामधे टण्या, भ्रमा, सुमॉ ह्यांच्या कथा आवडल्या.
बाकीचा अंक अजून वाचते आहे. मुलाखतींपैकी विद्या बाळ आणि अजय-अतुल ह्यांच्या मुलाखती वाचल्या.
गायकीचं शिक्षण नसताना, संगीत वा ओळखी असले कोणतेही वारसे नसताना ह्या द्वयींनी केलेली प्रगती कौतुकास्पद आहे! डॅफो, मस्त झाली आहे मुलाखत! :)

चांगल्या दिवाळी अंकाबद्दल संपादक मंडळाचे आभार :)

मस्त दिसतोय अंक. संपादकीय पानावरचं संगीत मस्त.
राही बर्वेच्या मुलाखतीपासून सुरुवात केली वाचायला. मुलाखत सडेतोड तर खरीच पण जरा कायतरी वेगळीच वाटली (म्हणजे नक्की काय ते अजून कळलं नाहीये कळलं की लिहेन) त्या मुलाखतीतल्या फोटोत राही बर्वे आहे का ?

अजय अतुलची मुलाखत फारच छान. बाकी सगळा अंकही १दम मस्त झाला आहे. अभिनंदन.

मला राहीची मुलाखत कायच्याकाय आवडली! 'अँग्री यंग मॅन'चं ज्वलंत उदाहरण.. प्रचंड टॅलेन्टेड, केवळ आपल्या अभिव्यक्तिशी इमान राखणारे, जगाची, 'लोक काय म्हणतील' याची पर्वा नसणारे, अंगात धमक असणारे सणकी लोक कसे असतात याचं मूर्तिमंत उदाहरण वाटला तो. आवडलाच.

"आवा ई कोकणवा हमार है बा" अप्रतिम. अभिनंदन, भ्रमर्_विहार.
ग्लास पेंटिंग आणि वन स्ट्रोक पेटिंग देखील छान आहेत.
बाकी अभिप्राय जसजसे वाचून होईल तसतसे देत जाईन.
मुकुंद कर्णिक

आख्यान मस्त! दिगुलीला, देवी, कोकणवा छान. गड आला.. एकदम भारी. काही कथा सुन्न करणार्‍या पण मांडणी अतिशय उत्तम.
पुलस्ति यांची मदार आणि स्वातीताईची कविता अन्वय आवडली.
ट्युलिप, स्मितावरचा लेख छान.
उभ्या उभ्या विनोद आणि पाककृती व्हीडीओ आवडलेत.

विवेक देसायानी सांगितलेले किस्से चांगले आहेत.
शेवटचा किस्सा भन्नाट :)
अंक अजुन वाचतोय. जस वाचेन तस तस इथे लिहित जाइन.

अंक सुरेखच आहे! अजून बरच वाचायचंय, पण जे वाचलं त्यावर...

स्मिता पाटीलवरचा लेख फार आवडला!
राही बर्वेची मुलाखतही भन्नाट. मी अजून त्याचे काहीच वाचलं, पाहिलं नाहिये पण इतका "क्रियेटिव्ह अ‍ॅटिट्यूड" असलेल्या तरुणाच्या रचना अनुभवायची ओढ या मुलाखतीने नक्कीच लावली!!
पद्माकर शिवलकरांवरचं लिखाणही खूप भावलं.
आणि हॅट्स ऑफ टू "रंग तरंग"! ग्लास पेंटिंग, जलरंग चित्रण, वन स्ट्रोक... वा वा फार फार आनंद देणारा अनुभव होता!!

समितीचे हार्दिक अभिनंदन आणि अनेक धन्यवाद. मिडिओक्रिटी कटाक्षाने टाळून दर्जेदार अंक दिल्याबद्दल!!
जस जसं वाचत जाईन तसे बाकी अभिप्राय देईनच...

साजिर्‍याचे दोन्ही पातक आणि फॉर ऑल... मस्त जमलेत. कुठेही पटरीवरुन घसरत नाही गाडी. भेळ पण आवडली. मिलिंदाचे उडते अनुभव एकदा वाचलेत. अनुभव सगळे इंटरेस्टिंग आहेत. पण कायतरी भट्टी चुकलीये असं वाटलं. पुन्हा एकदा वाचते :) भ्रमरची कथा छान जमलिये पण वाचून वाईट वाटले. स्वप्नपरी छान जमलीये. रुमाली वड्या मस्तच. अतिशय सोप्य शब्दात, मधुर आवाजात कृती सांगितली आहे. उभ्या उभ्या विनोदातले २-३ देसाईंकडुनच आधी ऐकले होते तरी पण पुन्हा तेवढेच हसू आले.

वाचला मी दिवाळी अंक बर्‍यापैकी. मस्त आहे. लेआऊट खरंच सुटसुटीत आहे.

सुरुवात 'प्रिय अमुचा' पासून केली. हा भाग खरोखर मस्त जमला आहे. खगोलशास्त्र आणि तत्वज्ञान हे जिव्हाळ्याचे विषय म्हणून आधी खगोलशास्त्र आणि संत हे लेख वाचले. दोन्ही लेख सुरेख आहेत. चांगली माहिती दिली आहे. विशेषत: अलिकडेच मायबोलीवर 'चांद्रयान मोहिमेचा काय उपयोग?' अशा अनेक पोष्टी पाहिल्या. खगोलशास्त्र पॉप्युलर करण्याच्या दृष्टीने तो लेख चांगला वाटला.

केदारचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरचा लेखही चांगला आहे. आवडला. मुकुंद यांचा क्रिकेटवरचा आणि फचा चित्रकलेवरचा लेखही मस्त आहे. नाटकं आणि संगीत नाटकं हे लेखही अगदी माहितीपूर्ण आहेत.

सुरेल महाराष्ट्र हा लेख तितकासा आवडला नाही. फारच संक्षिप्त आढावा वाटला. तसेच ग्रामीण पत्रकारिता ह्या लेखात concrete किंवा विषयाला धरून फारसे वाचायला मिळाले नाही असे वाटले.

सिनेमांवरील लेख अजून वाचले नाहीत.

आख्यान मधल्या सर्व कथा छान आहेत. अश्विनी, साजिरा, मेघना यांचे लेखन विशेष आवडले. भ्रमर ह्यांची कथा वाचून खरंच वाईट वाटले. टण्या, मंजुडी आणि विवेक यांनी केलेलं विनोदी लेखन एकदम मस्त. आवडलं. व्हिडीओमधला उभ्या उभ्या विनोद आधी पाहिला होता त्याच कार्यक्रमात तिथेच बसून. पुन्हा पाहिला आणि पुन्हा हसलो.

सर्व पेंटींगचे व्हिडीओ भन्नाट आहेत. अजय यांनीसुध्दा बाकी दोघांप्रमाणे जलरंगाबद्दल थोडं बोललं असतं तरी चाललं असतं. पण त्याच्याने काही फरक पडला नाही.

मुलाखती मात्र वाचायच्या आहेत अजून.

राजसगौरीचा लेख - मांजरपण मस्त जमलाय. लिहिण्याची स्टईल खुसखुशीत एकदम, मांजराचं टोपणनाव 'मुमुक्षू' वाचूनच हसू आलं :) भ्रमर विहार ची कथा आवडली.
ट्यु चा स्मितावरचा लेख मस्त ! फोटोही सही आहेत. स्मिता चा गौतम राजाध्यक्षांच्य प्रदर्शनातला एक ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटो आठवला, काय सुरेख, अन शार्प फीचर्स दिसलेत तिचे! त्यातही डोळे फारच इन्टेन्स !!
अनुभूती मधे रुमाली वड्या, पापलेट ची अमटी यम्मी!! पेन्टींग चे दोन्ही व्हिडिओ पण सही झालेत. सगळ्या व्हिडिओज ना सुरुवतीला दिवाळीअंकाच्या कव्हर ची स्लाइड, मग नावे वगैरे असे नीट फॉर्मॅट करून घेतल्याने युनिफॉर्म अन प्रोफेशनल लूक आला आहे अनुभूती विभागाला!! त्यबद्दल सम्बंधितांचे परत एकदा विशेष कौतुक.

नितांत सुंदर!
रस्किन बाँड, स्मिता पाटील हे लेख अप्रतिम! एकुणच अंक वाचनीय आणि प्रेक्षणीय झाला आहे! सर्व संबंधितांचे अभिनंदन!

छान आहे दिवाळी अंक!
मला सर्वात जास्त रंग तरंग विभाग आवडला! मायबोलीवरच्या इतक्या कलावंतांकडून हे असं वर्कशॉपसारखे काहीतरी नक्की सादर व्हावे असे वाटतच होते मला.. ते सहीच झाले आहे आणि! वन स्ट्रोक पेंटींगने तर मी तोंडात बोटं घातली... अप्रतिम आहे तो प्रकार! करून बघावासा वाटतो अगदी लगेच, असा सहज साध्या भाषेत समजवला आहे. ग्लास पेंटींग सुद्धा उच्च! अजय यांच्याकडून मात्र वॉटरकलर्सची काहीतरी बेसिक्स सांगण्याची अपेक्षा होती. आवाज नसल्याने नुसतेच चित्रकाराचे चित्र काढणे आपण पाहतोय असा फिल आला.. :अओ:

सुमॉ,साजिरा,नंदन, ट्युलिप्,भ्रमर_विहार, अश्विनी_गोरे सर्वांच्या कथा / लेख अप्रतिम! मजा आली!
साजिरा, गंधावरचा लेख अगदी उच्चप्रतीचा झालाय!! भयंकर आवडला !
मुलाखतींमधे - सर्वच मुलाखती घेतल्या छान आहेत. योग्य ते प्रश्न इत्यादी. पण उत्तरांच्या दृष्टीने राही बर्वेची मुलाखत प्रचंड आवडली! अगदी रोखठोक झाली आहे. त्याच्या त्या जिद्दीने, अ‍ॅटीट्युडने अगदी भारावून जायला झाले. तसेच अजय अतुल. काहीही शास्त्रीय शिक्षण नसताना त्यांनी जी भरारी मारली आहे , त्यामागचे त्यांचे विचार, कष्ट सर्व समजले. कर्नल बकरे देखील छान बोलल्या. परंतू अजुन खुलवायला हवी होती असं फार वाटलं. वैशाली सामंतची देखील मुलाखत छान.

कविता वाचल्या नाहीत, पाकृचे व्हीडीओज देखील अजुन पाहीले नाहीत.
प्रिय अमुचा .. भागाकडे ओझरती नजर टाकली आहे.. निवांत बसून वाचेन आता. परंतू लेखांच्या विषयांचे कलेक्शन मस्त आहे तिथे!!

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल चा केदारचा लेख आवडला.

साजिराचा गंधावरचा लेख मस्तय. :)
भेळ आवडली. महाशयानी अतिशय प्रामाणिकपणे लिहिलय. एकुणातच ज्या ज्या गोष्टींवर चित्रे प्रेम करतात त्या त्या गोष्टीवरच त्यांच लेखन सुप्पर असत. आठवा, बोम्बील अख्यान आणि अमिताभ बच्चनवरचा लेख. :)

अजुन वाचतोय. भरपुर दर्जेदार कन्टेन्ट आहे. त्यामुळे वेळ लागतोय वाचायला.
अख्खा अन्क जबरा जमलाय. सगळी सजावट आणि लेआउट खुप आवडला. अन्कासाठी मेहनत घेणार्‍या सर्वान्चे आभार आणि अभिनन्दन. :)

या छान अंकाबद्दल संपादक मंडळ, लेखक, लेखिका, मदत समिती चं अभिनंदन!! आतला लेआउट खूपच आवडला.
आणि सर्व मायबोलीकरांचे मनःपूर्वक धन्यवाद!! :)
भ्रमा कोकणवा.. आवडलं. कोकणचे कटू सत्य चांगलं दाखवलयस. मंजूचे दिगूलीला पण मस्त. गड आला वाचताना अगदी हहपुवा. :) विद्याताई बाळ यांची मुलाखत आवड्ली. बाकी अंक वाचायचा आणि पहायचाय आहे अजून.