अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००९बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

'दौलू' एकदम आवडले. सहज आणि सुंदर लिहीले आहे.

'दिवाळी संवाद' विभाग आज वाचून पुर्ण केला. (क्रम थोडा बदलला. पण 'प्रिय अमुचा' साठी डोके मोकळे हवे आहे जरा. ते यानंतरच वाचतो. :) )

'राही अनिल..' चा संवाद काय भन्नाट आहे..! जमून आलाय अगदी. अशीच जमलेली मुलाखत 'विद्या बाळ' यांची. बदलत्या काळासोबतच्या त्यांच्या बदलत्या कल्पना अन नवीन प्रयोग राबवायची तयारी बघून त्यांच्याबद्दलचा आदर आणखीच वाढला.

'बायफ' बद्दल याआधी वाचले होते, तरी याआधी माहित नसलेली बरीच माहिती मिळाली. डॉ. अशोक पांडेंबद्दलही ऐकलं नव्हतं. या संस्थेच्या कामाचा आवाका बघून थक्क व्हायला झालं.

'कर्नल बकरें'बद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे मुलाखतीच्या तंत्राबिंत्राकडे वगैरे लक्षच गेले नाही. त्यांच्या परिचयासाठी खास धन्यवाद. :)

वैशाली सामंत ठीक. अजय-अतुल मात्र बळजबरीने काहीतरी प्रश्न विचारून उत्तरे मागितल्यासारखी, थोडी विस्कळित अशी वाटली. त्यातल्या त्यात- थोड्याफार माहिती नसलेल्या गोष्टी कळल्या, हे माझ्या दृष्टीने या दोन मुलाखतींत महत्वाचे. :)

शर्मिला फड्केंचे दोन्ही लेख आवडले. रस्किन बॉंड वरचा आणि झाडांवरचा लेख दोन्ही सुंदर. वाचल्याचं समाधान मिळालं.
प्रिय अमुचा मधील बहुतांश लेख आवडले. अभ्यासपूर्ण खरोखर.
मराठी संगीत नाटकावरील लेखही सुरेख झालाय. प्रिय अमुचातील काही लेख हे विषयाच्या आवाक्यामुळे अहवाल सदृश झाले आहेत, पण त्याला इलाज नाही. केदार /आशिष यांचेलेख, फ, क्ष यांचे लेख, सर्वच वाचनिय.
स्पंदनही जबरी. आख्यानमधील कथा एक से एक.
अंकाशी संबंधित सर्वांचेच अभिनंदन.

'दिवाळी संवाद' वाचला.

राही बर्वे, मुलाखत आवडली.

'कर्नल बकरें' व्यक्तिमत्व आणि मुलाखत दोन्ही आवडले. पण अजुन विस्त्रुत चालली असती असे मलाही वाटले.

टुलिप ची स्मिता पाटील आवडली ...

"आख्यान" आणि "स्पंदन" सगळंच आवडलं. "प्रिय अमुचा" च्या मी प्रेमात पडलेय. सगळे लेख माहितीपुर्ण आणि सुरेख आहेत.

मस्त !

बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणतोय, पण आधी ऑफ़ीसात माबोने पुकारलेला संप, मग प्रॉक्सी सापडल्यावर मराठी टंकता न येण्याची समस्या या सगळ्या पार्श्वभुमीवर राहुनच गेले. पण आधी बरहा आणि आता गमभन (जय ओंकार जोशीबाप्पा) मुळे पुन्हा ते शक्य होतेय.

अंक सुरेखच आहे. लेख कथा कविता ... सगळेच छान ! स्मिताचा फॅन असल्याने ट्युलिपचा स्मितावरचा लेख प्रचंड आवडला. कॉलेजमध्ये असल्यापासुन स्मिता या नावाने वेड लावलं होतं मग तो मंडी असो वा उंबरठा. अगदी नमकहलाल सारखा तद्दन चित्रपटदेखील त्यात बच्चन असतानाही फक्त स्मितासाठी म्हणुन पाहिला होता. थोडी निराशा पदरी आली हे अलाहिदा, पण स्मिताबद्दल असलेले आकर्षण काही कमी झाले नाही. माझी आई देखील स्मिताची जबरदस्त फॅन आहे. त्यामुळे तिलाही प्रिंट घेवुन पाठवला. तिलाही खुपच आवडला लेख. तिच्यातर्फेही ट्युलिपचे आभार....!

आणि साजिर्‍याचा "फॉर ऑल दोज......" म्हणजे कळसच होता या अंकाचा !

छोट्या छोट्या प्रसंगातुन मानवी मनाच्या अवघड गुंफणी उलगडून दाखवणारा हा लेख खुप म्हणजे खुपच आवडला. साजिर्‍या धन्स रे ! :-)

बाकी मुलाखतीमधली "राही"ची मुलाखत. आयला, कसला जबरी माणुस आहे हा. फिदा झालो आपण तर.

इतका सुंदर अंक दिल्याबद्दल संपादक समितीचे मनःपूर्वक धन्यवाद.

मी आज सर्व मुलाखती वाचल्या. सगळ्या आवडल्या. त्यातही डॉ. पांडे आणि कर्नल बकरे ह्यांच्या मुलाखती वाचायला जास्त छान वाटल्या. चित्रपट किंवा तत्सम प्रसिद्ध क्षेत्रांशी संबंधित नसलेल्या मुलाखती कमी वाचायला मिळतात, म्हणून तसे वाटले असेल.

राही आणि वैशाली सामंत ह्या मुलाखतीही छान आहेत. अजय-अतुल मुलाखतही झकास. एकंदरित ह्यावेळी सर्व मुलाखती छान आहेत.

निवांत, चाखत-माखत वाचायचा असं ठरवूनही दिवाळी अंक अधाशासारखा वाचून काढला.
मांडणी, छायाचित्रं सगळंच दृष्ट लागण्याएव्हढं छान झालंय.
मजकूराबद्दल तर - मोडक, नंदन आणि शर्मिला फडके इ. 'नेहेमीचे यशस्वी कलाकारां'चे लेख फक्कड जमलेयत. 'रस्कि' बद्दल जास्त जिव्हाळा असल्यामुळे त्याचा लेख लिहिल्याबद्दल शर्मिलाला एक 'एक्स्ट्रा थ्यांकू' :) बालमावळ्यांची नाटकाची धमाल मस्तच! पाकृ.चे हाय-डेफिनिशन छायाचित्रीकरण विषेश उल्लेखनिय.
संपादक मंडळीं आणि इतर पडद्यामागच्या कलाकारांचे मनापासून आभार - तुम्ही घेतलेले कष्ट जाणवतायत.
पुढील अंकासाठी शुभेच्छा!

अंकावर प्रतिसाद द्यायला कंटाळा केला जातो, असे वाटते. :( :(
गुलमोहरात एखाद्या लेखावर दोन पाने तर सहजच येतात प्रतिसादाची. इथे तर कितीतरी सुंदर लेख, किती संशोधन अन संदर्भ शोधून लिहिले आहेत. विशेषतः 'प्रिय अमुचा' वाचताना हे सहजच लक्षात आले.

या विभागातले केदार, फ, क्ष, नंदिनी, रार यांचे लेख वाचून झालेत आतापर्यंत. क्षच्या लेखाची मध्यवर्ती कल्पना आवडली. केदार, फ, नंदिनी, रार यांनी अनेक संदर्भ वापरून अंकाच्या थीम परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने केलेले लेखन आवडले. या रुपात मायबोलीला महत्वाचे दस्तावेज मिळाले आहेत, यात शंकाच नाही. :)

उरलेले वाचन चालले आहे..

***

'पातक' आणि 'फॉर ऑल दोज..' वाचून प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

ज्यांना माहिती नसेल, त्यांच्यासाठी एक खुलासा जाता जाता - "फॉर ऑल दोज.. हु लेफ्ट देअर स्मेल बिहाईंड..!" हे 'गंध' या मराठी चित्रपटाचे शीर्षकगीत आहे.

नुकतीच ट्युलिप ह्यांची अ लव्ह सॉंग वाचली. अगदी उत्तम, सराईत. साजिरा यांचा फॉर ऑल दोज, हू लेफ्ट देअर स्मेल बिहाइंड! ह्या ललितलेखातले काही तुकडे फारच चांगले. एकंदरच छान. हिंसा आणि 'वॉर अँड पीस' दिवाळी अंकात का हे कळत नाही.

महाजालातला हा दिवाळी अंक अतिशय देखणा नि सुरुवातीलाच सुरेलही. व्वा महाराष्ट्राच्या संस्क्रुतीला जागणारा अंक आहे. पुर्ण पहायचाय.

संवाद बराचसा वाचून झाला. राही बर्वेची मुलाखत झक्कास. फक्त तो बोलतोय ते खरच प्रामाणिकपणाने बोलतोय की हे असं बोललेलं प्रामाणिक, परखड म्हणुन ओळखलं जातं म्हणुन बोलतोय हे कळायला थोडा वेळ लागेल. तसेच अनिल बर्व्यांविषयी बोलताना कै च्या कैच शब्दप्रयोग केलेत असे वाटले.

डॉ. पांडेंची मुलाखत आवडली. त्यांच्या संस्थेचे कार्य अजून बर्‍याचशा खेड्यापाड्यांत पोचायचे आहे. थोडी जाहिरातबाजी करायला हरकत नाही असे मला वाटते. तसेच प्रयोगशील शेतकर्‍यांचा उल्लेख थोडा गैरसमजातुन आलाय. प्रयोग करायला बरेच शेतकरी उत्सुक असतात पण प्रवरानगर परिसरातल्या "त्या" शेतकर्‍यासारखा रादर जमिनदारासारखा पाण्यासारखा पैसा सगळ्यांकडे असतोच असे नाही.

असो, विद्या बाळांच्या मुलाखतीतले शेवटचे उत्तर अतिशय आवडले आणि पटले. त्यांची कुटुंब व्यवस्थेवरील मतं संभ्रमात टाकणारी वाटली. वैशाली सामंतने संगीत पण दिलेय हे ठावुकच नव्हते.

कर्नल बकरेंच्या मुलाखतीवरील प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद :)

अतिशय सुरेख दिवाळी अंक नेटवर वाचायला मिळाल्याबद्दल सर्वात आधी संपादक मंडळातील सर्वांचे आभार आणि उशिरा देत असलेल्या अभिप्रायाबद्दल क्षमस्व!
मायबोली दिवाळी अंक खूप वर्ष वाचत आहे पण यावर्षी पहिल्यांदाच त्यासाठी लिहिले म्हणूनही जरा जास्त आपुलकीने वाचला. लेखन पाठवताना संपादकांनी प्रत्येकवेळी गरज पडेल तसे योग्य मार्गदर्शन केले, मदत केली, सहकार्य दिले याबद्दलही त्यांचे आभार. त्यांनी केलेली सर्व मेहनत नक्कीच फळास आली आहे. अंक खूप दर्जेदार आणि देखणा झाला आहे.
संपादकीय औचित्यपूर्ण. अंकाच्या थीमला व्यवस्थित रिप्रेझेन्ट करणारे असेच झाले आहे.
'प्रिय अमुचा' विभाग छान सजला आहे. संपूर्ण महाराष्ट्राची वाटचाल डोळ्यापुढे उभी रहातेय. काही बाबतीत जरा सविस्तर लिहावेसे वाटतेय. चालेल कां?

चित्रकलेच्या परंपरेमधे महाराष्ट्राच्या भित्तीचित्रांची माहिती फार उपलब्ध नाही असे 'फ'नी म्हटले आहे ते खरेच, पण याचे मुख्य कारण त्या चित्रांवर चित्रकारांची नावेच नसत. फक्त टिपू सुलतानाच्या दरबारात असणारे शिवराय महाराज सोलापूरकर नंतर सोलापुरात आले आणि त्यांनी पोथ्यांमधली चित्रे काढली ती ठाऊक आहेत. पेशवाईतल्या भिवबा सुतारांनीही शनवारवाड्यात चित्रे काढली होती. शनरवाडा गेला त्याबरोबर चित्रेही गेली. पाश्चात्य जगात १४व्या शतकातल्या चित्रकारांचीही चित्रे नावासकट उपलब्ध आहेत (उदा. इटालियन चित्रकार 'जोतो' याची चित्रे) पण भारतातले चित्रकार मात्र अशी अमूल्य चित्रे काढून आपली नावे अज्ञात ठेवून निघून गेले हे दुर्दैव आहे. कदाचित चित्रकार, शिल्पकार वगैरे त्याकाळात प्रामुख्याने राजाश्रयाने रहात असल्याने, त्यांचे स्थान राजाचे सेवक अशाच दर्जाचे असावे आणि त्यामुळे त्यांनी केलेली कामे त्यांची स्वतःची ठरत नसावीत. आपले नाव कलाकृतीवर घालण्याचा अधिकार त्यांना नसावा किंवा कदाचित चित्रकला, शिल्पकला यांना केवळ सजावटीचे एक माध्यम इतकेच स्थान असावे. मुगल कांग्रा शैलीतल्या हाताच्या बोटावर मोजता येण्याएव्हढ्याच चित्रकारांची नावे ठाऊक आहेत. चित्रकारांना मानाचे स्थान, नावानिशी ओळखण्याचा अधिकार नुसते देशातच नाहीतर आंतराराष्ट्रीय पातळीवरही ओळख मिळवून देण्याचे श्रेय जाते राजा रविवर्माला. भलेही हा थोर चित्रकार केरळात जन्मलेला असो. पण त्याची संपूर्ण कारकीर्द खर्‍या अर्थाने बहरली मुंबईत आणि मळवलीला जिथे त्याने पहिला छापखानाही टाकला. त्याची मोहीनी, लक्ष्मी, सरस्वती, शकुंतला सिरीज, दमयंती सिरीज अशी अनेक नंतर गाजलेली चित्रे मुंबईत अस्तानाच काढलेली आहेत. राजा रविवर्मा त्याअर्थाने महाराष्ट्राचाच चित्रकार म्हणून ओळखायला हवा. औंधच्या पंतप्रतिनिधिंनीही त्यांना दरबारात बोलावून अनेक उत्तमोत्तम चित्रे काढून घेतली होती. आजही ती तिथल्या म्युझियमचे भुषण आहेत.
बाकी आढावा छानच घेतला गेला आहे. राजा हरिश्चंद्र ते हरीश्चंद्राची फॅक्टरी लेखही आवडला.

अभिप्रायाने जागा जास्तच व्यापतेय. सध्या वेळ नाही म्हणून इथेच थांबते. पण लिहिन परत सविस्तर. This issue certainly deserves indepth appreciation.

व्हिडिओ आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. अंक सुरेख आहे. सर्व कथा आवडल्या. अजून पूर्ण अंक वाचून व्हायचा आहे. :(

वरील सर्वांशी सहमत.. दिवाळी अंक अतिशय सुंदर आहे . खूप आवडला. निवांतपणे वाचेन. मुखपृष्ठ आणि संगित, दर पानावर बदलणारी चित्रे खूप खूप आवडले. नितांत सुंदर अंकाबद्दल अभिनंदन आणि शतशः धन्यवाद.