अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००९बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

वा! सुंदर !! अ प्र ति म !! अंक सुरेख अन भरगच्च दिसत आहे!! कामे धामे सोडून वाचत बसावा असं वाटत आहे!! :) सजावट मस्त झालीय एकदम. दिवाळी खरी सुरु झाली आता!

अंक फारच सुंदर झाला आहे, मुखपृष्ठ आणि रचना फारच अप्रतिम.
राजांचा फोटो पाहुन उर अभिमानान फुलून गेला.
संपादक मंडळाचे आणि सर्व मायबोलीकरांचे आभार,
सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा...!!!

कोकणवा हमार है, फार सुंदर, बदलतं कोकण चांगल प्रकट झालं आहे, वाचताना कळकळ जाणवली.
संवाद विभाग आवडला. गझल देखिल श्रवणिय झाली आहे. सर्वांचे खुप कौतूक. आजुन खुप खजिना आहे, हळुहळू लुटूच.

पुन्हा एकदा मुखपृष्ठ आणि बांधणी अप्रतिम...!!!!!

अतिशय सुंदर मुखपृष्ठ!

आता खरी दिवाळी आल्या सारखं वाटतय! मुखपृष्ट फारच सुंदर! वाचायला ही मजा येणार असं दिसतय!! संपादक मंडळीचे अभिनंदन!

अतिशय देखणा अंक. layout पण अतिशय सुटसुटीत वाटतोय. आता निवांत बसून वाचेन. संपादक मंडळाचे मनापासून आभार.

खरोखर देखणा अंक. अंक उघडल्याबरोबर ऐकू येणारे संगीतही बहारदार. सवडीने वाचायचा आहे.

अंक चाळून झाला आहे फक्त. बरेच दिवस हा खजिना पुरणार आहे तर...मुखपृष्ठ, सुरुवातीचे संगीत एकदम छान..

अभिनंदन !!! अजुन एका विजयी अंकाबद्दल :)

अप्रतिम झालाय दिवाळी अंक. घाई घाईत चाळला. खूप आवडला. निवांतपणे वाचेन रात्री. मुखपृष्ठ आणि संगित, संयुक्त महाराष्ट्र्शी घातलेली सांगड, दर पानावर बदलणारी चित्रे खूप खूप आवडले. नितांत सुंदर अंकाबद्दल अभिनंदन आणि शतशः धन्यवाद.

मस्त दिसतोय अंक.. मुखपृष्ठ छान. संपादकिय मधे शिवाजी महाराज मस्त...
भरपूर खजिना आहे. नंतर निवांत वाचेन.

छान अंक! टीमचे अभिनंदन. एक खूप छान गोष्ट म्हणजे रेखाटने आणि चित्रं. मुखपृष्ठ सुंदर आहेच पण अंकातली चित्रंही समर्पक.
ट्युलिप, लाडवासारखी झालीये कथा. चव अप्रतिम :)
केवड्याच्या पानाचा सुगंध घमघमतोय.
बाकी अंक वाचायचा आहे अजून.

अप्रतिम ..............

संपादक मंडळाचे मनःपुर्वक आभार असा छान अंक काढल्याबद्दल.

या वेळेस विनोदी लेखांचे वेगळे सदर नाही?

सुंदर अंक. संपादक मंडळाचे मानावेत तेवढे आभार थोडेच आहेत. अंकासाठी अतोनात परिश्रम घेतले असणार आहेत हे अंक नुस्त चाळता चाळताच जाणवत. layout ,फोटो सगळच अप्रतिम झालय.
मी "भेळ" वाचला. एकदम भेळी सारखा चटपटीत झालाय लेख. आवडला.:) बाकी अजुन वाचल नाही.
बाकीचे लेख पण जसे वाचीन तसे प्रतिक्रिया देईन.

फारच सुरेख असा अंक आहे, मुखपृष्ठ - शिरोभागीची चित्रे, लेआउट.
लेख जसे वाचेन तसतसे प्रतिक्रीया देईनच. अंक खूप आवडला.
संपादक मंडळ - अनेक आभार!

बहुपेडी प्रतिभेचे अलक्षित सृजनकार मनोहर सप्रे ह्यांच्या पत्रप्रपंचावर करंदीकरांचा लेख अगदी वाचनीय झाला आहे. चित्रा गोडबोले ह्यांनी विद्याताई बाळ ह्यांच्याशी साधलेला संवादही फार आवडला.

मर्मबंध विभागात मदार, अन्वय व एका टाकाबद्दल ह्या कविता आवडल्या. अनवट छंदातली कैदी ही शब्दावेल्हाळतेच्या, अनुप्रासांच्या जाळ्यात सापडल्यागत वाटली. आभास, अस्वस्थ ह्या कविताही छान आहेत.

एक छान देखावासा भरघोस अंक दिल्याबद्दल संपादक मंडळाचे आणि निर्मात्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन व धन्यवाद. वाचीन तसे प्रतिसाद देत जाईन.

कोकणवा हमार है आणि हू लेफ्ट देअर स्मेल बीहाईन्ड आवडले.
सुसुत्र भारी!
गड आला पण.... चा शेवटचा गोंधळ वाचून हहपुवा
संवाद विभागात विद्याताई बाळ यांची मुलाखत पहिले वाचून काढली.

काही लेख सामान्य दर्जा आहेत. पण मायबोली दिवाळी अंक फुकट असल्याने एक वाचक म्हणून तक्रार नाही ;)

स्पंदन विभागात व्यक्तीचित्रण असलेले अनेक लेख आहेत आणि शिवाय दिवाळी संवाद मधे पण नामांकित व्यक्तिंच्या तब्बल ५ मुलाखती हे जरा टू मच वाटले.

छान आणि सुटसुटीत अंक घेऊन आल्याबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन आणि आभार.. :)
template छान आहे एकदम... sweet and simple !! मुखपृष्ठ छान आहे..
संपादकीय.. मला आत्तापर्यंतच्या सगळ्या अंकाच्या संपादकीयांपेक्षा जास्त आवडले.. !! खूप विषयाला धरून, मुद्देसुद आहे आणि मुख्य म्हणजे घिसंपिटं नाहीये ..
बाकी अंक पुरवून वाचायचा म्हणून फक्त चाळलाय.. संपादक मंडळ सदस्यांचा सर्वच विभागांमधे सक्रिय सहभाग दिसतोय... मंडळाच्या कामांमधून वेळ काढून स्वतःच्या साहित्यकृतीं वर काम करून त्या up to the mark घडवल्याबद्दल त्यांचे कौतूक..

श्रेयनामावलीतील सर्वांचे हार्दिक अभिनंदन. मुखपृष्ठावरील धून लै भारी.
वाचते आहे सावकाशीने.

अंक अतिशय सुंदर. सर्वांनी अतिशय मेहनत घेतलेली दिसते. :) सावकाशीने फराळाबरोबर अंकाचाही फडशा पाडेन. सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.

हा पहिला प्रतिसाद दिवाळी अंक हातात पडल्या पडल्याच दिलेला. एकदम देखणा आणि छान वाटतोय बघायला.अंकासाठी झटलेल्या सर्व मंडळींचे अभिनंदन. आता हळू हळू सगळे वाचेन आणि मग प्रतिक्रिया देईन.

अहा...ज्याची उत्सुकतेने वाट बघतो......तो आपल्या मायबोलीचा दिवाळी अंक आला......नुसताच आला नाही तर आपल्या देखण्या रुपाने वेड लावलं. फार सुरेख झालाय अंक. सध्या नुसताच चाळलाय. हळुहळु वाचून प्रतिक्रिया देईनच. पण प्रथम दर्शनी बघितल्यावर खूपच आवडेश :)

सगळ्या संबंधित लोकांचं खूप खूप अभिनंदन :)

अजून अंक पूर्ण चाळायचाय. पण ट्यूलिपच्या करोगे याद तो..... वर एकदम फिदा. भ्रमरविहारच्या आवा...ई कोकणच हमार है बा.... मस्तच.

अंक अप्रतीम झालाय! नीलू, मुखपृष्ठ अप्रतीम आनि संपुर्ण अंकात त्यातल्या रंगाचा मस्त वापर, प्रत्येक पानावरचे बदलणारे चित्र सगळेच सुंदर झालेय. श्रेयनामावलीमधील सर्वांचे अभिनंदन. तुमचे कष्ट दिसताहेत सगळीकडे. आता हळूहळू वाचते सगळे.

अंक सुरेख आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन.

अतिशय देखणा दिवाळी अंक! श्रेयनामावलीमधील सर्वांचे; तसेच, सर्व लेखकुंचे आणि कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन!

महाराष्ट्रदेशा हे दोन वेगळे शब्द हवेत ना.. महाराष्ट्र देशा असे.. ते मुखपृष्ठावर एकत्र दिसत आहेत.

सर्वाना दिपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा,,,,,सुरेख असा अंक आहे,,
नुसताच चाळला. पण सावकाश वाचणार आहे. सुंदर ऊघड्ताना ऐकू येणारे संगीतही सुरेल आहे, अगदी प्रसन्न आहे,

मस्त झालाय अंक अगदी सुरवाती च्या संगीता सकट, सावकाश वाचणार

मुखपृष्ठ मस्तच आहे..
फक्त चाळला अंक... आता निवांत वेळ काढुन वाचणार...

:-)