अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००९बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

>>महाराष्ट्रदेशा हे दोन वेगळे शब्द हवेत ना.. महाराष्ट्र देशा असे.. ते मुखपृष्ठावर एकत्र दिसत आहेत.<<

माझ्या मते, 'महाराष्ट्र हाच देश' => 'महाराष्ट्रदेश' अशा अर्थाचा हा 'कर्मधारय समास' आहे. त्यामुळे अचूकपणे लिहिण्यासाठी हा सामासिक शब्द त्यातील दोन्ही घटकशब्दांसह सलगच लिहायला पाहिजे.

कथाविभाग चाळला... सिध्दहस्त लेखिका शोनू ह्याची कथा बर्‍याच दिवसांनी बघून छान वाटलं ! मस्त आहे कथा एकदम.. वातावरण निर्मिती आणि डिटेलिंग नेहमीप्रमाणेच छान... सुपरमॉम ह्यांची कथा ही आवडली.. ह्यावेळी विषय आणि पार्श्वभूमी वेगळी आहे..
कथाविभागात स्वाती, पूनम, श्र, दाद, कौतूक, विशाल कुलकर्णी ह्यांच्या कथाही दिसतील अशी अपेक्षा होती.. त्यांनी उणिव जाणवत्ये.. :)
ट्यू ची कथा आधी वाचल्यासारखी वाटते आहे.. ती तिच्या ब्लॉग वर किंवा हितगुजावर प्रसिध्द झालेली आहे का???? की मला देजावू होतोय???
I_am_sam चा फोटोग्राफी बद्दलचा लेख वाचला.. अतिथय सोप्या शब्दात छान माहिती दिली आहे... त्याबद्दल धन्यवाद.. वन स्ट्रोक पेंटिंग चा व्हिडियो पण मस्त आहे.. नविन विषय पहायला मिळाला...

संवाद विभागातला कर्नल बकरे ह्यांची मुलाखत वाचली. हे ह्या संवादाचे नक्की फायनल व्हर्जन आहे का?
की चुकून जुनं व्हर्जन आलय ? आणि हे जर फायनल व्हर्जन असेल तर शब्दांकनात नक्की काय केलं हा प्रश्ण मला पडतोय.. त्यांची पार्श्वभूमी नीट आलेली नाही, संवादाचा शेवट अतिशय abruptly झालाय..
"कामाच्या स्वरूपाचा लाईफस्टाईलवर कसा परिणाम झाला" "किती वर्षं झाली आर्मी जॉईन करून?" "उतरताना तुमच्या बॅकग्राऊंडचा किती आणि कसा फायदा झाला?" हे प्रश्न सोप्या मराठीत लिहिता आले नसते का? वाहत्या बाफंवर ही बोली भाषा ठिक आहे.. पण दिवाळी अंकात तरी हे मला खटकलं..
"वडिलांसारखे नौसेनेत अथवा इतर सुरक्षा दलात न जाता डॉक्टर व्हायचे कसे ठरवलेत " >>> ???कर्नल बकरे जेव्हा शिकत होत्या तेव्हा किंवा आज सुध्दा किती मुली वडिल सैन्यात आहेत म्हणून सैन्यात जातात ?? हे प्रमाण अतिशय कमी आहे माझ्या मते .. (चुकीचं असल्यास सांगा कृपया..) हा प्रश्न वेगळ्या पध्दतीने ड्राफ्ट करता आला असता..
कामाचं स्वरूप आणि संसार याबद्दल तुम्ही एकमेकांना कसं समजावलं? >>> हा प्रश्न आणि उत्तर ह्याच्यात तफावत जाणवते.. हा ही प्रश्ण वेगळ्या पध्दतीने फ्रेम करता आला असता..

असं? का बरं? >>> हे म्हणजे धावत्या बाफ वरच्या "आहेस का? का? :फिदी :" सारखं वाटतय.. !!

लिहिताना प्रश्नांचा क्रम ठरवताना अजून खूपच सुधारणा करता आली असती... वेगवेगळे प्रश्न हे त्यांच्या विषय/आशयानुसार क्रमाने घेता आले असते... एकूण एका खूप चांगल्या आणि वेगळ्या विषयावरच्या संवादाला पुरेसे लक्ष / वेळ न दिल्याने न्याय देता आलेला नाही असं मला वाटतयं.. :(

दहाव्या वर्शाचा दीपावली अंक आवडला. फ्क्त एक सुचना करावीशी वाटते , या आंकात चांगल्या कवितांचाही सामावेश केला तर आणखी बहार येईल असे वाटते .तसेंच गजल फार सुरेख अशाच आणखी काही जुन्या गजलांचाही सामावेश करता आल्यास पहावे

क्ष

आज अंक जरा सवडीने वाचायला पहायला वेळ मिळाला.

संपादकीय आवडले. त्या पानावर वाजणारी ध्वनिफीतही छान.

आख्यानमधले आत्तापर्यंत वाचले ते सगळे आवडले. भ्रमरची 'कोकणवा', सुमॉ ची 'देवी' छान जमल्या आहेत. सुशिलाकाकू... मेघना, वा!
'गड आला...' एकदम हहपुवा आहे! :) प्रत्यक्ष नाटकाचा प्रसंग तर मस्त रंगलाय. पल्लीचे रेखाटन छानच.
'शेलारमामा, मग लढाईवर आम्ही स्वत: जाऊ. लढाईची तयारी करा’.
'पण महाराज, तुम्ही असताना आम्ही लढाईवर जाणार, तर तुमचा काय उपयोग?’ :) :)

संवाद सेक्शन आवडला. सगळे वाचून झाले. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असल्यामुळे विविधता आहे. मला राही बर्वेंची आवडली. सडेतोड एकदम, "माझ्या लेखी खरं जागतिक तोडीचे मराठी लेखन जी.एं.पासून सुरू झालं आणि जी.एं.सोबत संपलं" :) विद्या बाळ आणि वैशालीला काही वेगळे चांगले प्रश्न विचारले आहेत. पांडेंची मुलाखत खूप माहितीपूर्ण आहे. अजय-अतुल ही माझ्यासाठी नवीन माहितीच. बकरेंची मुलाखत साचेबद्ध नाही, थोडी 'गप्पा' टाईप झाली आहे. शेवटी मुलाखत हे एक संभाषणच असते तेव्हा ती अशी अनौपचारीक होऊ शकते. त्यांना मराठी येत नाही तेव्हा त्यांच्या उत्तरात जसे इन्ग्रजी आहे तसे एखाद दुसर्‍या प्रश्नात असायला हरकत नाही, नाहीतर दोन्हीतला फरकही खटकू शकतो वाचताना. तसंच बोलणार्‍याकडून नवी माहिती, विचार ऐकायला मिळाले तर ठरवून केलेल्या लिस्टपेक्षा वेगळा प्रश्न अर्थातच सहाजिकच विचारला जाऊ शकतो आणि विचारला पाहिजेच, तसा 'असं? का बरं? हा उस्फूर्त प्रश्न आहे असं मला वाटतं.

अनुभूती मधले 'रंग तरंग' छानच आहे. ग्लास पेन्टिन्ग, 'वन स्ट्रोक' आवडले. दिलेल्या वेळात व्यवस्थित माहिती देऊन शिकवले आहे, व्हिडिओची क्वालिटीही चांगली आहे. ते सगळ्या पाककृती व्हिडिओबाबतही म्हणता येईल. सगळ्या रेसिपी शोजच्या तोंडात मारतील असे व्हिडिओ केलेत सगळ्यांनी . :-) पाककृती काही वेगळ्या/नवीन नाहीत पण बघायला छान वाटते. पुढच्या वेळी काही नवीन, खास तंत्र लागणार्‍या (उदा. मोदक) रेसिपी पहायला आवडतील म्हणजे व्हिडिओ माध्यमाचा चांगला उपयोग होईल.

कोडे एक्स्पर्ट गजाननचे कोडे छान (अवघड) आहे. ते प्रिन्ट करुन सोडवायचे आहे. पुढल्या अंकात तिथेच अक्षरे टाईप करण्याची सोय झाली तर बरे होईल. :)

छानच आहे दिवाळी अंक. आभार संपादक मंडळ आणि मायबोलीचे.

स्वाती आंबोळे यांच्या दोन्ही कविता खूप खूप आवडल्या.

शरद

दिवाळी अंक मस्त दिसतोय. मुखपृष्ठ व आतिल पाने पण छानच. संपादकीय खूप आवडले.

'गड आला पण..' - खूप हसले. लिहीण्याची पद्धत मस्त.
'देवी' - आवडली
'अ लव्ह साँग' - आधी ट्युलिपच्या ब्लॉग वर सुरूवात वाचली होती.

अजून वाचते आहे.

'अ लव्ह साँग' वाचली. खास ट्यु टच आहेच :)

गड आला.. मस्तच हहपुवा झाली. शोनु, अगो आणि सुमॉ तिघींच्या कथा अस्वस्थ करुन गेल्या. शोनुची वाचताना तर कसेसेच झाले. पण तीनही कथा नवर्‍याकडुन काही ना काही स्वरुपात (भावनिक, मानसीक, शारिरीक, शाब्दिक) जाच होणार्‍या स्त्रीयांच्या आहेत त्यामुळे विषयात तोच तोच पणा जाणवतो. त्यात मी एकामागुन एक वाचल्यामुळे तर अजूनच तसे जाणवले. शोनुच्या कथेविषयी मै ला अनुमोदन. अस्वस्थ होते वाचताना आणि वाचून झाल्यावर खूप वेळ.

मांजरपण लै भारी. एकदम खुसखुशीत आहे लेख.

आणि कितीतरी नेहमीच्या व्यावसायिक अंकांच्या तुलनेत उजवा आहे. >>> १०० वेळा अनुमोदन.

टण्याची कथा लई भारी .. फुल हहपुवा.. :)

डॅफोचा ग्लास पेंटींग चा व्हिडीओ मस्त आहे एकदम !! पूनम आणि मृ च्या पाकृ पण छान आहे.. आतापर्यंट बघितलेल्या सगळ्या व्हिडीओचं रेकॉर्डींग आणि एडीटींग सही झालय एकदम..

विनय देसाईंचा उभ्या उभ्या विनोद बारा बाफ गटग मधे आवडलं होतं... आज मात्र पकलं फार.. :( तेच ते पुण्यावरचे घिसेपिटे विनोद... जरा काहितरी बदला हो !!! म्हणजे पुण्यावर विनोद करा पण जरा नाविन्य आणा काहितरी...

विषयाच्या आवडीप्रमाणे आधी हे दोन वाचले. दोन्ही एकदम आवडले!
१. राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी - रार - एवढ्या वर्षांतील मराठी चित्रपटांचे विषय, चित्रपटांचे प्रकार, वगैरेंची सुंदर माहिती आहे. त्याच बरोबर मराठी चित्रपटांत सहसा न दिसणारे विषय ही बरोबर मांडले आहेत.
२. '...दोन खेळाडू' - मुकुंद - मस्त लिहीले आहे. पहिले म्हणजे दोन तुलनेने विस्मृतीत गेलेले खेळाडू निवडण्याची कल्पना छान आहे. महाराष्ट्राच्या (म्हणजे राज्याच्या. 'महाराष्ट्र' रणजी संघाच्या अशा अर्थाने नव्हे) अशा खेळाडूंची दखल घेउन खूप चांगले काम केले आहे. (मुकुंद अशा इतर खेळाडूंबद्दल तुझ्या इतर लेखांत वाचायला आवडेल). देवधर ज्यावर्षी १०० वर्षांचे झाले तेव्हा महाराष्ट्राचा रणजी संघ रणजी करंडक जिंकेल अशी शक्यता निर्माण झाली होती, पण अंतिम सामन्यात हरल्याने उपविजेतेपदावर महाराष्ट्राला समाधान मानावे लागले होते ते आठवले. देवधर खेळत असताना दोन वेळा जिंकल्यावर महाराष्ट्राच्या संघाने नंतर कधीही रणजी करंडक जिंकलेला नाही (ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी - मुंबईचा रणजी संघ वेगळा आहे).

"गड आला पण..." भन्नाट आहे :D

सर्व माबोकरांना तवांग मधून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! मी अंक वाचला नाहिये.. परतलो की वाचेन.. ज्यांनी ज्यांनी माझ्या कथेला अभिप्राय दिला त्यांचे आभार (हे म्हणजे इन्टेंशनल स्टान्ससारखे झाले.. पण असो).. इथे डायल अप कनेक्शन आहे.. त्यामुळे बाकी वाचणे अवघडच.. (माबो बंद आहे म्हणुन इथे पोस्टतोय..).. माबोवर पोस्टायची खाज १०००० फुटावर सुद्धा जात नाही.. कोणी माबोकर एव्हरेस्टवर गेला तरी तथून लॉगिन करेन बहुधा..

एक खुलासा :

ट्युलिप यांच्या कथेचा सुरुवातीचा एक परिच्छेद त्यांनी त्यांच्या रंगीबेरंगीवर आणि ब्लॉगवर लिहीला होता, जो लगेच काढूनही टाकला होता. पूर्ण झालेली कथा दिवाळी अंकाआधी कुठेही प्रकाशित झालेली नव्हती. (अंक प्रकाशित झाल्यानंतर ब्लॉगवरची कथाही पूर्ण केली आहे.)

राही बर्वे, डॉ पांडे आणि कर्नल बकरेंच्या मुलाखती आवडल्या. विद्या बाळांची मुलाखत चांगली तरीही त्रोटक वाटली. अजय-अतुल आणि वैशाली मुळातच आवडत नाहीत (वै.म.) तरीही माबोकरांच्या आहेत म्हणुन मुलाखती वाचल्या.

सुशीलाकाकु वेगळेपणासाठी आवडल्या. गड आला,सांवरा रे, कोकणवा, दिगुलीला आवडल्या. बाकीच्या कथा वाचते आहे. आभास,कैदी, अन्वय, मदार, अस्वस्थ या कविता खूप आवडल्या.

स्पंदन मधील सर्वच लेख आवडले पण माउंटनस इन माय ब्लड- वाचताना तर डोळ्यात पाणी आलं. मनोहर सप्रेंवरील लेखही झकास.

बाकीचे वाचते आहे हळुहळु. अंक छानच आहे, आणि कितीतरी नेहमीच्या व्यावसायिक अंकांच्या तुलनेत उजवा आहे.

मुखपृष्ठ मस्तच आहे..
फक्त चाळला अंक... आता निवांत वेळ काढुन वाचणार...
आभार संपादक मंडळ आणि मायबोलीचे.

ऑनलाईन अंकाचे वैशिष्ट्य असलेला 'दृक्-श्राव्य' विभाग अप्रतिम झाला आहे. विनय देसाई ह्यांचे विनोद सही आहेत. सारंगची गझल आवडली.

रंग-तरंग विभाग बघून मी थक्क झालेय! :) डॅफोचं ग्लास पेंटींग, तिने केलेली अनेक पेंटींग्ज, एक कलाकार यांचे सहज पण अप्रतिम स्ट्रोक्स आणि त्यांनी केलेलं प्रोजेक्ट, अजय यांचं जलरंगातलं पेंटींग, त्याचं पार्श्वसंगीत आणि थेट रंग मिक्स करून कॅनव्हासवरच चितारणं हे सगळंच मला सिंपली ग्रेट वाटलं.. ह्या तिघांना स्पेशल शाबासकी!

पाककृती सर्वच छान.. ऐन दिवाळीत पापलेटं पाहून तोंडाला पाणी सुटलं.. पीठाच्या करंज्या ही नवीन पाकृ कळाली आणि रूमाली वड्यांची अचूक पद्धतही. विनय, कराडकर आणि मृण्मयी ह्या तिघांनाही धन्यवाद.

गजाननचं कोडं बघायचं आहे अजून.. काहीतरी डोकेबाज नक्कीच असणार :)

संपादकीयमध्ये वाजणारी 'बहु असोत'ची धूनही सुंदर झाली आहे. मुख्य म्हणजे ती आपोआप सुरू होते, त्यामुळे छान वाटतं :)

दिवाळी संवाद वाचून झाला..

वैशाली सामंत आणि अजय-अतुलची मुलाखत आवडली. विश्वविनायकच्या निर्मितीमागचं कारण, ध्येय आणि झपाटलेपण वाचल्यावर तर ती जोडगोळी जास्तच आवडू लागली आहे. योगायोगाने कालच झी-मराठीने त्यांचा कार्यक्रम दाखवला. पुनःप्रक्षेपण असूनही तो जास्तच आवडीने बघितला-ऐकला गेला.

राही बर्वेची मुलाखत फार सुंदर झाली आहे. शर्मिला, अगदी नेमके प्रश्न विचारले आहेस. त्यानेही खुप छान मनमोकळेपणी उत्तरे दिली आहेत. त्याला भविष्यातील योजनांबद्दल अनेक शुभेच्छा!! (लेखक अनिल बर्वेंबद्दलची मते वाचताना ठसका लागला. :-) पण त्याची एकूणच विचारपद्धती थोडीफार माहीत असल्याने धक्का वगैरे बसला नाही. )

बाकी, अंक जसजसा वाचेन तश्या प्रतिक्रिया देईनच.

वेळ मिळेल तसा वाचतोय. लेख, कथा, कविता, मुलाखती सुंदरच आहेत.

सगळ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा ! धन्यवाद. :-)

एक वाचनीय दिवाळी अंक : मा, बो. २००९
मा.बो.चा दिवाळी अंक संपूर्ण वाचून काढायचा म्हणजे सलग तीन-चार तास तरी मोकळे हवेत. तेवढे मिळवता येणारच नाहीत असं नाही पण आवडता पदार्थ पुरवून- पुरवून खावा हे संस्कार अजून शिल्लक असल्यामुळे मी तुकड्या-तुकड्यांनी अंक वाचला. काही 'तुकडे' तर असे लाजवाब आहेत की सपाट्यात केलेल्या वाचनामुळे त्यांच्यावर अन्यायच होतो. मग थोड्या दिवसांनी पुन्हा सावकाशीनं [रवंथ करत] वाचायचं ठरवलं आहे. माझ्या आत्ताच्या प्रतिक्रिया ज्याला 'फर्स्ट ब्रश' म्हणतात तशा आहेत.

एक म्हणजे सगळंच लिखाण अतिशय उत्स्फुर्त आणि उत्कट आहे. सगळेच जण हौशी आणि उत्साही आणि तरीही बहुतेकांच्या लेखनात 'प्रोफेशनल' सफाई! रतीब घातल्यासारखे दिवाळी अंक काढणार्‍या संपादकांसाठी आणि कथा-कविता-मुलाखती-ललित लेख इ.चा रतीब घालणार्‍या 'साहित्यिकां' साठी जून ते ऑगस्ट ही तिमाही म्हणजे अगदी हात-घाईची असते! बद्धकोष्ठ झालेल्यांना कुंथावं लागतं तेव्हाच त्यांची 'सुटका' होते, त्याच पद्धतीनं संपादकांच्या ससेमिर्‍यातून साहित्यिक स्वतःची सुटका करून घेत असावेत अशी शंका यावी इतके हे अंक आणि त्यांतलं लिखाण 'पाट्या' टाकल्यासारखे 'प्रेडिक्टेबल' असतात. [ही उपमा कुणाला जरा 'अशिष्ट' वाटली तरी हरकत नाही पण तो अनुभव सार्वत्रिक आहे!] त्यातुलनेनं मा. बो. वरचं लिखाण अधिक 'जीवंत' 'सहज-स्फूर्त' वाटतं.

अंकाचा कथाविभाग वाचनीय आहे, तो मुख्यतः विषयांच्या वैविध्यामुळे. उजवं-डावं करायचंच झालं तर टुलिप, साजिरा, सुपरमॉम यांच्या कथा अधिकच ऊठून दिसणार्‍या.

कविता-विभागासाठी आपल्या 'शेलक्या' रचना - मदार, कृत्रिम पाऊस, आभास - कवींनी खास दिवाळी अंकासाठी राखून ठेवलेल्या असाव्यात. पैलतीर ही कविता आणि त्यासोबतचं चित्र म्हणजे 'सोनेमे सुहागा' च! स्वाती आता 'हौशी' गटातून 'व्यावसयिक' गटात मोडू लागलीय पण तिच्या कविता आपला ताजेपणा टिकवून आहेत, हे महत्वाचं!

'ललिता'मधेही विषयांचा भरपूर वेगळेपणा आहे. तद्दन भिकार आणि कंटाळवाण्या टी. व्ही. मालीकांमधले कलाकार [बिच्चारे! पापी पेटके लिये उन्हे क्या क्या नही करना पडता!] हल्ली 'पी हळकुंड आणि हो गोरी' पद्धतीनं 'सेलिब्रिटी' झाले आहेत. गाण्यांच्या स्पर्धात बक्षिसे मिळाली की झाल्याच नव्या सेलिब्रिटी तयार! आधीच 'सेलिब्रिटी' पदावर पोचलेल्यांनी नाच किंवा गाण्यांच्या स्पर्धात भाग घेतला की तो 'डबल धमाका' होतो! अशा सेलिब्रिटीजच्या लांबलचक मुलाखती दिवाळी अंकांमधल्या [जाहीरातीतून बची-कुची] जागा अडवू लागल्या आहेत. जाहीराती आणि 'तसल्या' मुलाखतींचा सुळसुळाट नसणे हा मा. बो. चा केवढा मोठा 'प्लस पॉईंट' आहे!

अनेक मा.बो. करांनी किती छान छान छंद जोपासले आहेत! विशेष म्हणजे त्या छंदिष्टपणात मिळवलेल्या अनुभवांवर आधारीत लेखन ते करतात, मग ते ललित असो किंवा कथा असोत. मला असल्या 'अस्सल' साहित्यातला ताजेपणा खूप भावतो.

अनेकांच्या लिखाणात 'नोस्टाल्जिआ' आढळतो. खरं म्हणजे आपल्या समाज-जीवनात इतक्या झपाट्यानं स्थित्यंतरं घडतायत की एका पिढीचे अनुभव लगेच दुसर्‍या पिढीला 'जुने' किंवा 'परके' वाटू लागतात. त्यातून ज्यांनी खेड्यातून शहरात, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात किंवा थेट परदेशात स्थलांतर केलं आहे, त्यांच्या बाबतीत तर ही भावना आणखीनच गडद होते! तिचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडणं अगदी स्वाभाविक आहे. [बी. एम.एम. सारख्या सम्मेलनांचा तर मुख्य भर त्यावरच असतो!] वास्तवाला नाकं न मुरडता, त्या 'स्मृती-रंजना'त स्वतः रममाण होणं आणि इतरांनाही त्यात सामील करून घेणं यात काहीच चूक नाही. वाचकांनाही त्यामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. फक्त त्यावर किती भर द्यायचा याचं भान सुटायला नको, एवढंच.

सजावट आणि मांडणी यावर संपादक मंडळानं भरपूर मेहनत घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे अंक खूप देखणा झालाय. तेवढंच लक्ष, दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण साहित्य मिळवण्याकडे पुरवल्यामुळे, ह्या वर्षीही मा.बो. बक्षिस पटकावणार हे नक्की.

एकंदरीत, दिवाळी अंकाची भट्टी मस्तच जमलीय! अभिनंदन!

-बापू करंदीकर

अतिशय सुरेख अंक. सावकाशीने वाचेनच.
संपादक मंडळ आणि अंकनिर्मितीमध्ये सहभगी सर्वांचे अभिनंदन.

विद्याताईंच्या मुलाखतीनंतर संवाद विभागातल्या इतर काही मुलाखती वाचल्या. गप्पा म्हणा किंवा काहीही, कर्नल बकरे ह्यांची मुलाखत मात्र आवडली. ह्याचे कारण कर्नल बकरेच. मुख्य म्हणजे त्यांच्या मुलाखतीने वाचता वाचता एक कथा विणली. एक चांगले दस्तऐवजीकरणही (डॉक्युमेंटेशन) झाले.

वैशाली सामंत व अजय अतुल ह्यांच्या अनेकार्थाने तुटपुंज्या व 'घिश्यापिट्या' मुलाखती दिवाळी अंकासाठी तरी योग्य वाटत नाहीत. तसेही अशा तथाकथित वलयांकितांकडे सांगायला फारसे काही वेगळे असतेच असे नाही.

आख्यान वाचतेय. शोनू, सांवरा रे सॉल्लिड जमलीय! पहिल्या पॅरापासून जी एक हूरहूर, अस्वस्थता येते ती कथा संपली तरी तशीच राहिली. हॅट्स ऑफ! वातावरणनिर्मिती तर खास आहेच.
टण्याची गोष्ट मस्त .हहपुवा :) टण्या कितव्या यत्तेत रे असा प्रश्न परत डोकं वर काढत आहे!
मेघनाची लिहिण्याची स्टाईल आवडली. सुशीलाकाकू व तत्सम -चांगली जमलीय.
बाकी वाचून होईल तसं पोस्टतेच.

राजसगोरी यांचे मांजरपण फार्फार आवडले. very funny.

आत्ता अधाश्यासारखा अंक वाचतेय. उरलेली प्रतिक्रिया नंतर!!!

मलाही आख्यान आवडले. ट्युची गोष्ट खूपच मोठीये, न वाचताही खास ट्यु टच जाणवतोय.
सुमॉची गोष्ट यावेळी जरा वेगळी पण मस्त. भ्रमर विहारची गोष्ट डोळ्यात पाणी आणते, एकदम वेगळाच विषय निवडलाय त्याने.
मै शी सहमत टण्याच्या गोष्टीबाबत. मस्तच लिहिलीये, अगदी हहपुवा.
मेघना, शोनू ही छान.
बाकी संवादात सिंडी चा संवाद मलाही अपूर्ण, तुटक वाटला. पण पुन्हा एकदा सावकाशीने वाचेन. अजय-अतुल, वैशाली सामंत ठीक ठीक.

सगळे व्हिडीओ बघीतले, एकदम अव्वल दर्जाचे झालेत. योग्य ठिकाणी पार्श्वसंगीताचा वापर, सुस्पष्ट आवाजातले निवेदन आणि योग्य वेळमर्यादा यामुळे सगळे व्हिडीओ फार आवडले.
टण्याची गड आला पण सिंह गेला एकदम झक्कास झालीये, कोकण वाचून फार हुरहुर वाटली. शोनूची सावरां रे आवडली. खूप दिवसांनी तिने लिहीलेले काही वाचायला मिळाले.
सध्या इतकेच, बाकीचे अजून काही वाचले नाही.

'ग्रामीण पत्रकारिता..' लेख एकूणच पत्रकारितेबद्दल चांगली माहिती देतो.

या लेखा खाली 'विविध गावांतील पत्रकार' हे तिसर्‍या ओळीत हवे ना? आत्ता आहे तसे वाचून ते चतुर्वेदी हेच विविध गावांतील पत्रकार आहेत असा समज होतो :)

अश्विनी गोरेची त्रिशंकू विसरलेच सांगायला. तीही मस्त जमलीये.

खुप सुंदर अंक !
सर्वच कथा लेख उत्तम... ! विशेषत: "ग्रामीण पत्रकारीता....." विदारक अनुभव.
ट्ण्याची "गड आला......" पोट धरुन हसवते तर :आवा कोकण..." वाचताना डोळे भरुन येतात.
स्वातीताई, गिरीशजी ई.च्या कविता नेहमीप्रमाणेच सुंदर !
एका सुंदर आणि मनोवेधक अनुभवासाठी मन:पुर्वक धन्यवाद. :-)

अंक अतिशय देखणा आहे. निलु ने बनवलेल मुखपृष्ठ अप्रतिम आहे.
सध्या वाचतोय.
भ्रमर विहार ची जगन्याची कथा वाचली. आवडली.
नकळतच गावी जाताना पन्हाळ्याच्या वाटेवरच्या डोन्गरात बन्दीस्त कुम्पणात असलेले घेलाशेठ, तेलाशेठ लोकान्चे बन्गले आठवले.
अद्याप प्रचन्ड सन्ख्येने नाहियेत पण फार दिवस रिकाम्या जागा दिसतील अस वाटत नाही.