विशेष वैचारिक लेख

आधुनिक शस्त्रक्रियेचा जनक

आधुनिक शस्त्रक्रियेचा जनक - डॉ. जोसेफ लिस्टर.

"रोहन, वाढलंय रे सगळं, चल ये लौकर जेवायला - पण आधी हात धू स्वच्छ... अगदी नीट साबणाने धूवून मगच ये हं ... "

"आईऽऽ कस्लं लागलंय बघ गुडघ्याला !!"
"अरे, असं कसं झालं - चल पहिलं अँटिसेप्टिक क्रिम लावूयात त्याला .."

लेखन प्रकार: 

लखलख चंदेरी पात्यांची न्यारी दुनिया

"ही दायकोन ओरोशी अजिबात नकोय मला. "
"तुला दायकोन नाही आवडत? "
"छे त्या मुळ्याचा वास मला नाही आवडत, त्यात तो किसलेला मुळा तर त्याहून नाही. "
"मी तुला एक मुळ्याचा वेगळा पदार्थ दाखवतो तो नक्कीच आवडेल बघ. पुढच्या वेळेस आपण दुसऱ्या एका ठिकाणी जाऊ लंचला"
"नको. मी मुळा खायला म्हणून कुठल्याही ठिकाणी जाणार नाही"
"नाही मुळा ही मुख्य डिश नाही, सलाड म्हणुन देतात तिथे. तू बघ तर " इति मित्र.

लेखन प्रकार: 

एकेक थेंब रक्ताचा

शासकीय सेवेतून निवृत्त होवून दीड वर्ष होऊन गेले तरीसुद्धा विभागीय रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय औरंगाबाद व रक्तदान शिबिरे ह्यांचा संबंध अजूनही कायम आहे. रक्तपेढीतील डॉक्टर्स /कर्मचारीह्यांना मदत हवी असल्यास मला संपर्क करुन बोलावतात तसेच रक्तदान शिबिर संयोजकही सातत्याने संपर्कात रहातात. गरजू रूग्णांचे नातेवाईकही रक्ताची गरज असल्यास माझ्याशी संपर्क करतात. मी केवळ विभागीय रक्तपेढी औरंगाबाद येथे नोकरीच करत नव्हते तर स्वेच्छा रक्तदान चळवळीची एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत होते याची स्पष्ट जाणिव मला आज होत आहे.

लेखन प्रकार: 

श्रेयनामावली

संपादक मंडळ
मंजूडी, अमित वर्तक, शुभदा परांजपे, मिलिंदा, जाई, पुलस्ति, विजय देशमुख

सल्लागार
अल्पना, rar

मुखपृष्ठ
स्वप्नाली मठकर, मिलिंदा

रेखाटने, जाहिराती आणि अंकातील सजावट
अल्पना, मिनोती, डॅफोडिल्स, नीलू, मंजूडी, मिलिंदा, अमित वर्तक, पुलस्ति, जाई, भाग्यश्री नचिकेत सरदेसाई-भानस (Crochet कमळ छायाचित्र)

दृक्श्राव्य विभाग
अमित वर्तक ,विजय देशमुख

मुद्रितशोधन
शुगोल, सिंडरेला, मैत्रेयी, सायो, नंदन, बिल्वा, आनंदयात्री, भारती बिर्जे डिग्गीकर, अरभाट, चिनूक्स, पुलस्ति, मंजूडी, आर्फी

शब्दांकन/देवनागरीकरण
मृण्मयी, अश्विनी के

विशेष आभार

लेखन प्रकार: 

संपादकीय

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।

उठा, जागे व्हा, लक्ष्यप्राप्ती होईपर्यंत मागे वळून पाहू नका!
हे विचार जगासमोर आणणार्‍या स्वामी विवेकानंदांची दीडशेवी जयंती यंदाच्या वर्षी साजरी होत आहे. अवघं एकोणचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या नरेद्रांचे विचार आज दीडशे वर्षांनंतरही जगावर गारूड करून आहेत.

लेखन प्रकार: 

हीलिंग हार्मनी

Dr. Shekhar Kulkarni.jpg

ब्रेस्ट कॅन्सर जगभरात चांगलाच फोफावला आहे. या रोगाचं प्रमाण सध्या अमेरिकेत आठ बायकांमध्ये एक इतकं आहे. भारतात शहरांमध्ये ते बावीस बायकांमध्ये एक इतकं आहे. म्हणजे अमेरिकेपेक्षा कमी असलं, तरी आपल्याकडे हे प्रमाण चिंता करण्यासारखं आहे. आणि वाईट म्हणजे ते दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणजे एक आपली जीवनशैली बदलणं आणि कॅन्सर होणारच असेल, तर तो लवकरात लवकर हुडकून काढून उपचार करणं.

लेखन प्रकार: