विशेष वैचारिक लेख

परिहार सेवा - काळाची गरज

माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू ठरलेलाच असतो. कधी, कुठे, कसा मृत्यू येणार ह्या तपशीलांमधे फरक पडला तरी कधी ना कधी हे घडणार हे आपल्या सगळ्यांना माहित असतं, पण आपण तो विचार कानाआड टाकून जमेल तेवढ्या उत्साहानं, आशेनं जीवनाचा उपभोग घेत असतो.

एक व्यक्ती म्हणून हे बरोबरच आहे. शेवटाच्या, भविष्याच्या विचारानं वर्तमानकाळ का खराब करायचा?
पण समाज म्हणून, समाज चालवणार्‍या संस्थांना याचा विचार करावा लागतो, तरतूद करावी लागते. त्यातूनच परिहार सेवेचा जन्म झाला.

इंग्रजीत ज्याला ’पॆलिएटिव्ह केअर’ म्हणतात त्याला मराठीत ’आधिव्याधि परिहार’ म्हणता येईल. ह्याचेच सुटसुटीत रूप - परिहार सेवा.

लेखन प्रकार: 

स्टेम सेल थेरपी: बाजारातल्या तुरी

काही दिवसांपूर्वी माझ्या परिचयातले एक गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांची सून गरोदर होती. बाळ जन्मतानाच
त्याच्या नाळेतून रक्त काढून घेऊन ते जतन करून ठेवावं, भविष्यात त्याला काही गंभीर आजार झाल्यास हे
जतन करून ठेवलेलं रक्त आणि त्यातील पेशी उपयोगी ठरतील, असं त्यांना सांगण्यात आलं होतं आणि ते याबाबत माझा सल्ला घ्यायला आले होते. 'याला किती खर्च येईल?' या प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर चक्रावून टाकणारं होतं! मी या विषयावर अनेक दिवसांपासून विचार करतोय आणि 'मायबोली'नं लिहायची संधी दिलीय तर त्याचा फायदा घ्यावा म्हणतोय.

लेखन प्रकार: 

आयुर्वेदाची बलस्थाने आणि आयुर्वेदासमोरील आव्हाने

आयुर्वेद (आयु:+ वेद) म्हणजे आयुष्याविषयीचे ज्ञान. हे ज्ञान असणे वा मिळवणे म्हणजेच उत्तम जीवन जगण्याचा मार्ग आहे. आयुर्वेदाचा पायाच शरीर आणि सृष्टीतील साधर्म्याचा विचार यांवर बेतलेला आहे. त्रिदोष, सप्तधातू व मुख्यत्वेकरून पंचमहाभूते हे मूलभूत सिद्धांत असलेल्या आयुर्वेदीय चिकीत्सेची व्याप्ती खूप मोठी आहे.'स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनं च |' म्हणजेच रोग होऊच नये म्हणून शरीराची प्रतिकार क्षमता वाढवणे, तसेच एका रोगाचा उपचार करताना नवीन रोग निर्माण होणार नाही याची काळजी घेणे.

लेखन प्रकार: 

नोबल ईज ही हू नोबल डज

हा लेख लिहिला जातो आहे, तो नोबेल पारितोषिकांचा महिना आहे. भौतिकशास्त्र, इकॉनॉमिक्स इत्यादी विषयांमध्ये नोबेल हे त्यात्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामाकरता दिले जाते (गणितात नोबेलऐवजी 'फिल्ड पारितोषिक' दिले जाते). अर्थातच नोबेल मिळवणे सोपे नाही हे वेगळे सांगणे न लागे. कधीकधी या पारितोषिकांबद्दल (इतर सर्व गोष्टींप्रमाणेच) वादविवाद निर्माण होतात (या वेळचे इकॉनॉमिक्सचे तिघांना दिले गेले ज्यांच्या थिअर्‍या एकमेकांना पूरक नाहीत). एक पारितोषिक जास्तीत जास्त तिघांमध्ये विभागून देता येते (या वेळचे हिग्जच्या शोधाकरताचे दोघांनाच दिले गेले. L.H.C. या संस्थेलापण द्यायला हवे होते, असे अनेकांचे म्हणणे आहे).

लेखन प्रकार: 

बदल

दिनांक - १०/०७/१९७३
सुलोचना : का रे, एकदम आल्याआल्या लोळायलाच लागलास, बरं वाटत नाही का?
बंडू : आई, मला सायकल हवी आहे.
सुलोचना : बाबांना विचार.
बंडू : ते मी विचारीन, पण एकदा तू विषय तरी काढून बघ.
सरूताई : बंड्या, काय भुणभुण चाललीये आईकडे?
सुलोचना : काही नाही हो. आता कॉलेज दूर आहे ना त्याचं, जाण्यायेण्यात वेळही खूप जातो आणि दमायलाही होतं असं म्हणतोय.
सरूताई : खरं का रे बंड्या? का मित्रांनी सायकली घेतल्या म्हणून तुलापण हवीय?
बंडू : आज्जी, तू पण ना! तू म्हणतेस तेही एक कारण आहे. पण तेवढं एकच कारण नाही.

लेखन प्रकार: 

झोपेचं खोबरं!

"काय मग! झोप लागली का नीट?" - कुणालाही हा प्रश्न विचारून बघा. बहुतेक लोकांकडून उत्तर मिळेल, " छ्या! का माहिती नाही, पण अधूनमधून सारखी जाग येत होती." पण त्याच माणसाच्या कुटुंबातील इतर लोक, विशेषत: 'बेटर हाफ', म्हणतील, "काय झोप लागली नाही म्हणतोय! रात्रभर चांगला घोरत होता. याच्या घोरण्यानं उलट माझीच झोप नीट झाली नाही!!"

HDA-Sleep.JPG

लेखन प्रकार: 

डॉ. एडवर्ड जेन्नर - वैद्यकीय शास्त्रातील एका नव्या युगाचा उद्गाता

(In science, credit goes to the man who convinces the world, not the man to whom the idea first occurs. —FRANCIS GALTON)

१४ मे १७९६ हा दिवस इंग्लंडमध्ये नेहमीसारखाच उजाडला. पण बर्कले गावातील डॉ. एडवर्डकरता मात्र तो अतिशय विशेष दिवस होता. त्यामुळेच की काय पण आदल्या रात्री एडवर्डला शांत झोपही लागली नव्हती. तरीही ठरल्याप्रमाणे आज त्याला 'तो' प्रयोग प्रत्यक्ष करून पाहायचाच होता - तोही एका मानवावर - जेम्स फिफ्सवर.

लेखन प्रकार: 

छंद माझे वेगवेगळे - नाना पारनाईक

Parnaik_Sir_Image.jpg

ठा

ण्याच्या पारनाईक सरांची ख्याती 'एक कमालीचा छंदिष्ट माणूस' म्हणून ऐकून होतो. आधी कधी त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नव्हती, ती 'मायबोली' च्या निमित्ताने झाली.

लेखन प्रकार: