विशेष वैचारिक लेख

चित्रपट संग्रह - विलास पाटील

वि

लास पाटील हे साहित्याचे अतिशय उत्तम प्राध्यापक. पण पुस्तकांबरोबरच चित्रपटांचा संग्रह करण्याचा त्यांचा छंद. त्यांच्याकडे अंदाजे ५००० चित्रपट व्हीडिओ कॅसेट, डीव्हीडी अशा स्वरुपात उपलब्ध आहेत. यात अतिशय दुर्मिळ चित्रपटांचाही समावेश होतो. चित्रपटाचा नुसता संग्रहच नाही तर, त्याच वेडापायी घराच्या गच्चीवर एक ओपन एअर थिएटरही त्यांनी बांधलेलं आहे आणि नामवंत मंडळींनी तिथे अभिजात चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. या छंदाबद्द्ल ऐकूयात त्यांच्याचकडून --

लेखन प्रकार: 

इतिहासाचा ध्यास मजला - मानसिंग कुमठेकर

'इ

तिहासाचे पंख लावून वर्तमानात वावरणार्‍या' मानसिंग कुमठेकरांना इतिहास उलगडून दाखवणार्‍या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद जडला. सांगलीत तरुण भारत दैनिकात काम करणारे मानसिंग सांगत आहेत आपल्या छंदाच्या प्रवासाबद्दल.

लेखन प्रकार: 

एकला चालो रे

AsiaBrownFlycatcher.jpg
Asian Brown Flycatcher- HK 2012

गळी नाही म्हणता येणार, पण ही माझ्या पक्षीनिरिक्षणाच्या आणि पक्षीप्रकाशचित्रणाच्या छंदाची साधी वाटचाल. अजून माझे या विषयातील ज्ञान आणि कौशल्य प्राथमिक अवस्थेत आहे याची मला नम्र जाणीव आहे. वाचकांनीही लक्षात घ्यावे कृपया.
लेखन प्रकार: 

लिंगाधारित व्यक्तिमत्त्व

लेखिकेचा अल्प परिचयः
लेखिका तनया मोहांती एफ एम युनिवर्सिटी, ओरिसा इथे समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. लिंग, व्यक्तीमत्त्व शोधन आणि माध्यम ह्या विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या छंदांमधे लघुकथा आणि इतर लेखन प्रकारांचाही समावेश आहे.
प्रस्तुत लेख त्यांच्या एम फिलच्या विषयावर आधारित असून निरिक्षणांसाठी/निष्कर्षांसाठी प्राथमिक शाळा ते बारावीपर्यंतच्या मुलामुलींच्या मुलाखतीतून मिळालेली माहिती वापरली आहे.

--------------

लिंगाधारित व्यक्तिमत्त्व

लेखन प्रकार: 

लिंगनिरपेक्षता समजून घेताना

लिंगनिरपेक्षता सापेक्ष आहे आणि ती संकल्पना स्त्रीवादाशी निगडीतच आहे, असे वाटते. स्त्रीवाद म्हणजे स्त्रीवर्चस्ववाद नसून समानतेसाठी झगडा होता. मग त्याचेच derivative आणि अर्थविचाराचा प्रभाव, आधुनिकोत्तर काळ यांमुळे व्यक्तीवाद रुजला आणि फोफावला. पण त्याच्या उड्या स्त्रीवादाच्या, स्त्रीशिक्षणाच्या, मतदानासारख्या इतर मूलभूत गोष्टींच्या जिवावर आहेत. बाईपण (किंवा पुरुषपण, if you may) हे जैविक की सामाजिक किंवा किती जैविक आणि किती सामाजिक, याच्या उत्तराशी लिंगनिरपेक्षता त्या त्या व्यक्तिपुरती निगडीत असावीशी वाटते. 'मी' प्रथमत: एक व्यक्ती आहे की एक स्त्री/पुरुष?

लेखन प्रकार: 

गैरसमजांच्या विळख्यातील लिंगनिरपेक्षता

’लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री’ अर्थात genderless identity - genderless friendship असा विषय परिसंवादासाठी जाहीर झाला, त्या दिवसापासून ह्या विषयावर माझं मत नक्की काय आहे, हे तपासून पाहायला सुरुवात झाली होती. नंतर परिसंवादाच्या घोषणा, जाहिराती ह्यांवरुन लोकांना पडलेले उलटसुलट प्रश्न, शंका हे पाहता ’लिंगनिरपेक्ष’ हा शब्द अनेक जणांना गोंधळात टाकतोय, हे प्रकर्षाने जाणवलं. इतरांच्या कशाला, प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्याही मनात ह्या विषयाबद्दल संभ्रम होताच, कारण त्यापूर्वी ह्या विषयावर जास्त विचारच केलेला नव्हता. ह्या परिसंवादाच्या निमित्ताने तो झाला हे चांगलं झालं.

लेखन प्रकार: 

लिंगनिरपेक्षता सोयीनुसार की प्रामाणिक?

परिसंवादाच्या घोषणेमधली ती डॉक्टरांची जाहिरात पाहिली आणि विषय एकदम क्लिक झाला (असं मला वाटतय!). कारण तसाच थोडाफार प्रकार अगदी २/३ महिन्यांपूर्वीच माझ्याबाबतीत घडला. माझ्या फिमेल फिजिशियनचा अनुभव पहिल्याच भेटीच्या वेळी चांगला आला नाही. त्यामुळं नवरा सारखा म्हणत होता की, आतातरी त्याच्याच मेल फिजिशियनला प्रायमरी फिजिशियन म्हणून निवड. खूप चांगला अनुभव आला होता नवर्‍याला वेळोवेळी. पण मी अडून बसले फिमेल फिजिशियनकडेच जाणार, फक्त आता दुसरी बघेन. "डॉक्टरच्या बाबतीत कसं बघू शकतेस तू मेलफिमेल वगैरे?

लेखन प्रकार: 

लिंगनिरपेक्षता आणि फ्रॉईडचा सिद्धांत

"मला जर फ्रॉईडला भेटणे शक्य असते, तर तो भेटताक्षणी मी त्याच्या एक थोबाडीत ठेऊन दिली असती..." काय? दचकलात ना मंडळी हे वाचून? मी ही अशीच दचकले होते. मीच काय आम्ही सगळेच... पण हे उद्गार काही अगदीच अनाठायी नाहीत. सिग्मंड फ्रॉईड या जगद्विख्यात मानसशास्त्रज्ञाने / 'मनोविश्लेषणाच्या' (सायकोअ‍ॅनॅलिसिसच्या) जनकाने जो एक सिद्धांत अनेक वर्षांपूर्वी मांडून ठेवला आहे, तो कितीही प्रसिद्ध झालेली असला, त्याच्यातून कितीही नवनवीन विचारधारा जन्माला आल्या असल्या, तरीही मन त्याचा स्वीकार नाहीच करु शकत. मग आमचे सरच त्याला कसे अपवाद असतील?

लेखन प्रकार: 

मैत्र

'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' या विषयावर चर्चा होईलच. पण मला आधी मैत्री म्हणजे काय ते तपासून पाहायचे आहे. का लागतो 'मित्र'? (यापुढे हा शब्द मी लिंगनिरपेक्ष अर्थाने वापरणार आहे.)

पहिले कारण म्हणजे त्याची सोबत आवडते. सोबत म्हणजे एकत्र असणे, फिरणेच नव्हे, तर निव्वळ गप्पा मारणेदेखील. आता या गप्पा सुखदु:खाच्याच पाहिजेत, असे काही नसते. अगदी आपल्याला आलेला एखादा भलाबुरा अनुभव, एखाद्या घटनेबद्दल आपले मत, आपली प्रतिक्रिया, आपल्याला मिळालेले यश, अपयश अगदी काहीही कुणालातरी सांगावेसे वाटते.

लेखन प्रकार: