बालगीत

अ आ आई

अ आ आई, म म मका
मी तुझा मामा, दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे, ढ ढ ढगात चांदोमामा दडे
घ घ घड्याळ थ थ थवा, बाळ जरी खट्याळ तरी मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते, च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी स स ससा, मांडीवर बसा नि खुद्कन हसा

क क कमळ पाण्यावर डुले, ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुकझुक जाई, बाळ माझे कसे गोड गाणे गाई

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

गोरी गोरी पान

गोरी गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण ॥ ध्रु ॥

गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडिवर चांदण्याची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण ॥ १ ॥

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान ॥ २ ॥

वहिनीशी गट्टि होता, तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होउ दोघी आम्ही सान ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांशी लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नाच रे मोरा ......

नाच रे मोरा अंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच.... IIधृII

ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच....
नाच रे मोरा नाच.... II१II

झरझर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊं, काहीतरी गाऊ
करून पुकारा नाच....
नाच रे मोरा नाच.... II२II

थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळू दोघात
निळ्या सौंगड्या (सवंगड्या) नाच....
नाच रे मोरा नाच.... II३II

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: