दिवाळी संवाद

दिवाळी संवाद : मेघना एरंडे

तुम्ही निकलोडियन वाहिनीवर 'निंजा हातोडी' ला हिंदी बोलताना ऐकले आहे का? तुम्हाला कार्टून नेटवर्क किंवा पोगो वाहिनीवर हिंदी बोलणारा 'नॉडी' गोड वाटतो का?
क्रेयोन शिन चान ,शिबी मारुको चान,पारमेन ही सगळी जपानी पात्रे हिंदी कशी बोलतात असा तुम्हाला प्रश्न पडतो का?
तर त्याचं उत्तर आमच्याकडे आहे. आपली मराठमोळी आघाडीची डबिंग कलाकार 'मेघना एरंडे' हीच ह्या सर्व पात्रांना हिंदी भाषेमध्ये आवाज देते. हो हीच ती मेघना जी आपल्याला कधी 'फू बाई फू' आणि 'कॉमेडी एक्सप्रेस'मध्ये दिसते तर कधी 'सनई चौघडे','मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' आणि नुकत्याच आलेल्या 'टाइमपास' अशा चित्रपटांमधून भेटीला येते.

लेखन प्रकार: 

संवाद - डॉ. विद्या अत्रेय

'बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी युवकाचा मृत्यू', 'बिबट्याच्या दहशतीमुळे अकोले परिसरात अघोषित संचारबंदी', 'जुन्नरमध्ये बिबट्यांचा हैदोस', 'आरे कॉलनीतला बिबट्या नरभक्षक?' अशा बातम्या आपण सगळेच गेली काही वर्षं वर्तमानपत्रांतून सतत वाचत असतो. 'बिबट्यांच्या समस्येला माणूस जबाबदार आहे का? एसएमएस करा तुमचे उत्तर..' असंही आपण टीव्हीवर अधूनमधून ऐकत असतो. जुन्नर, अकोले, ठाणे, संगमनेर या भागांमध्ये बिबटे विरुद्ध माणूस असा संघर्ष उभा राहिल्याचं चित्र प्रसारमाध्यमांमधून रंगवलं जातं.

लेखन प्रकार: 

बैजू पाटील

कुठल्याही सजिवाच्या आयुष्यात श्वासाला जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व माझ्या आयुष्यात वन्यजीवसृष्टीला आहे. छंद म्हणून जंगलात भटकायचं आणि नुसतेच प्राणी-पक्षी यांचे फोटो काढायचे, हे मला मान्य नाही. या वन्यसृष्टीतील दुर्मिळातला दुर्मिळ क्षण टिपायचं वेड मला आहे. या झपाटलेपणामुळे मी वाट्टेल ती जोखीम पत्करायला कधीही तयार असतो. कधी गुडघाभर चिखलात तासन्‌तास उभं राहावं लागतं, तर कधी काट्याकुट्यातून प्रवास करावा लागतो. पण मला याची पर्वा नाहीये. कारण असामान्य काम करायचं असेल धोका सामान्य असून चालणारच नाही. जंगलातले असामान्य क्षण टिपण्यासाठी मी कितीही वेळ प्रतीक्षा करू शकतो.

लेखन प्रकार: 

संवाद: वैद्य सुनिता तारकुंडे-आंबेकर

"कॉलनीचं 'सरस्वती' नाव सार्थ ठरवायला म्हणून सगळ्या सरस्वत्याच आहेत."
"सगळ्या सरस्वत्याच आहेत म्हणून तर कॉलनीचं नाव सरस्वती आहे."

लेखन प्रकार: 

शौर्याचे तव दीप उजळू दे!

भारतीय सैनिकांच्या कारगिल येथील शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता 'छोडो मत उनको!' असं म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान! पण कित्येकांना या तेजाच्या स्फुल्लिंगांचा विसर पडला आहे आणि त्याच जोडीला आजच्या तरुण रक्ताला योग्य दिशा नाही, आदर्श नाहीत म्हणून ओरड होताना ऐकू येत आहे.

लेखन प्रकार: 

संवाद - सचिन कुंडलकर

को

बाल्ट ब्लू. रन्वार आणि फिन्सेन्ट फॉन हॉख यांचा आवडता रंग. झळाळता, रसरशीत, स्वतंत्र अस्तित्व असलेला. उल्हसित करणारा. इतर निळ्या रंगांपेक्षा वेगळा. या रंगाला स्वत:ची ओळख आहे. हा रंग अचेतनाभोवती चेतना निर्माण करतो, अवकाशाला पूर्णत्व प्राप्त करून देतो. आपलं अस्तित्व जाणवून देणारा कोबाल्ट ब्लू इतर रंगांमुळे झाकोळून जात नाही. किंबहुना तो आपली जागा हक्कानं मागून घेतो. अनेकदा हा रंग नितळ, पारदर्शक वाटतो. कोबाल्ट ब्लू हा अस्सल व्यक्तिवादी रंग आहे.

लेखन प्रकार: