दिवाळी संवाद

बॉर्डरलेस - मुलाखत

'बॉ

र्डरलेस'चं नाव प्रथम ऐकलं ते २०११मध्ये. मायबोली टीशर्ट विक्री उपक्रमातून जमा झालेली रक्कम संस्थेला दिली जाणार होती, आणि तशी घोषणा त्यावेळी टीशर्टांच्या बातमीफलकावर करण्यात आली होती. मात्र ती ओळख तेव्हा तितकीच राहिली. खरं सांगायचं तर 'अधिक कदम आणि बॉर्डरलेस' हे नावही मनामध्ये व्हायला हवं तितकं रजिस्टर झालं नाही.

लेखन प्रकार: 

शालेय शिक्षणात तंत्रज्ञान

'आ

मच्या वेळी हे असं नव्हतं' किंवा 'जमाना बदल गया है' हे उद्गार तुम्हाला मला काही नवीन नाहीत. ही किंवा अशाप्रकारची वाक्यं आपण जाता-येता, कळत नकळत ऐकत असतो आणि ऐकवतही असतो. गंमत म्हणजे 'जमाना हा नेहेमी बदलतच असतो' आणि शिक्षणक्षेत्रही याला अजिबातच अपवाद नाही. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आता ही काही विधानं पहा..

लेखन प्रकार: 

दिलखुलास! (उत्तरार्ध)

---या सगळ्यातून छंदांसाठी वेळ द्यायला जमतं का?
अरे अ‍ॅवॉर्ड घेऊन आल्यापासून माझे बरेच दिवस हे मुलाखती देण्यातच चालले आहेत. नवनवीन पत्रकारांशी, सूत्रसंचालकांशी, वाहिन्यांशी मी संवाद साधते आहे. नव्या ओळखी होताहेत, मैत्री होतेय. हे सगळं मी आत्ता खूप छान एन्जॉय करते आहे.

---तुला कवितांची आवड आहे? फेसबूकवर तू आर्टस् आणि एंटरटेन्मेंटमध्ये संदीप खरेचं पेज टाकलं आहेस . . .

लेखन प्रकार: 

'निर्माण' घडताना..

दुसरं म्हणजे समाजाची गरज काय आहे हे बघायचं असेल तर समाजात मिसळावं लागेल. आता आमच्या आयुष्याची पहिली ते पदवीपर्यंतची पंचवीस एक वर्षं शाळा-महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या आवारातच जातात. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्य कसं आहे हे आम्हाला कळतच नाही. जे कळतं ते फार फार तर प्रसारमाध्यमांमार्फत ज्या प्रतिमा आम्हापर्यंत पोचवल्या जातात त्याचमधून. तू दूरदर्शन पाहिलंस तर असं वाटेल की भारतात तरुण मुला-मुलींचं सुंदर असणं याची सर्वात जास्त गरज आहे.

लेखन प्रकार: 

त्याच्याविना...त्याच्यासाठी!

"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे" ह्या उक्तीप्रमाणे जगणारं हे एक जोडपं, नागेश आणि शरयु घाडी. लग्न, मग त्यानंतर बाळाचं आगमन, त्याच्या बाळलीलांमध्ये बुडून जाणं इथपर्यंत त्यांचा प्रवास तुमच्या माझ्यासारखाच. आता दुडक्या चालीने बाळ घरभर फिरेल आणि मग त्याच्या ह्या अशा मस्तीच्या कौतुकमिश्रित तक्रारी कराव्यात असंच काहीसं स्वप्न बघणारं हे जोडपं. पण सटवाईने ललाटी लिहिलेला लेख काही वेगळाच होता.

लेखन प्रकार: 

जगाशी संवाद : कॅमेर्‍यातून!

छायाचित्रणकार प्रत्येक दृश्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. काही दृश्यं तानेसारखी असतात, काही एखाद्या शांत गाण्यासारखी, काही सुंदर चित्रांसारखी तर काही रखरखीत वास्तव दाखवणारी असतात. कित्येकदा स्टुडिओच्या आत वास्तववादी परिणाम साधावा लागतो. दिवसा रात्रीची वेळ तर रात्री दिवस निर्माण केला जातो. अशावेळी वैयक्तिक अनुभव, पाहिलेली ठिकाणं, प्रवासांमधले अनुभव, व्यक्ती आणि विशेष प्रसंगांचं निरीक्षण हे फार उपयोगी पडतं.

'जे

लेखन प्रकार: