रंगीत पेन्सिल वर्षा पेंडसे - जोशी चित्रीकरण - स्वप्नाली मठकर संकलन - अमित वर्तक, विजय देशमुख लेखन प्रकार: दृकश्राव्य
किनारा श्रद्धा जुनीच आहे, ईश्वर जुनाच आहे दररोज माणसांचा गोंधळ नवाच आहे भेटायला कधीही, ये जीवना इथे मी होतो तिथेच आहे, होतो तसाच आहे जागून रात्रभर मी बसतो जिच्या उशाशी ती आठवण तुझी अन, मीही तुझाच आहे या नेहमी असू द्या गाठीस चार कविता गाठायचा तुम्हाला पल्ला बराच आहे हे विश्व, हे पसारे; हे स्थूल सूक्ष्म सारे सगळे खरे, जरी हे सगळे उगाच आहे सरला प्रवास, आला अर्धाच शेर हाती आयुष्य एक मिसरा, तोही उलाच आहे याहून सोसवेना आता मला किनारा ही लाट वाट पाहे; क्षण हाच, हाच आहे लेखन प्रकार: दृकश्राव्य