मायबोलीवरच्या सिद्धहस्त शायरांना एकच विषय देऊन त्या एका विषयाचे अनेक पैलू आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न यावेळी गझलविभागात केला आहे. अर्थात त्याची मजा तेव्हाच जेव्हा ते पैलू आपल्यासमोर एकत्रितपणे मांडले जातील! 'काळ' या एकाच कल्पनेची विविध रूपे आपल्याला या चिमुकल्या मुशायर्याचा एक वेगळाच आनंद देऊन जातील, अशी आशा आहे.



