






related1:
स्मार्ट ट्रेनिंग सर्विसेस
हापिसात डुलकी काढताना जागेपणाचे सोंग आणायचे ट्रेनिंग
स्वतः लोळत, आराम करत इतरांकडून काम करवून घ्यायचे ट्रेनिंग
थापा मारण्याचे व पकडले न जाण्याचे ट्रेनिंग
मित्रांच्या खिशावर डल्ला मारण्याचे ट्रेनिंग
एकदा आमचे ट्रेनिंग घ्याल तर परत परत याल!!
आजच संपर्क साधा : उल्टीबोंबमारायचीनै@बुडलोरेदेवा.कॉम
चिकटे आम्रखंड
बॉसच्या बाष्कळ बातांनी वैतागलात? बायकोच्या बडबडीने बेजार झालात? सासूच्या बेरकी बोलांनी बावचळलात? निरुद्योगी शेजार्यांच्या चांभारचौकशांनी बोअर झालात?
एकच उपाय....!! चिकट्यांचे आम्रखंड आजच खरेदी करा आणि बोलणार्यांची तोंडे एका दमात बंद करा!
एकदा चिकटलेले तोंड पुन्हा सहा तास न उघडण्याची हमी!
** आमची कोठेही शाखा नाही. दुपारी १ ते ४ वेळेत आमची वामकुक्षी भंग करणार्यांची तोंडे आम्ही चिकट्यांचे आम्रखंड खायला लावूनच बंद करतो!