बालसाहित्य

चेटकिणीचे स्वप्न

फार फार वर्षांपूर्वी एका डोंगरावर एक चेटकीण राहत होती. खरंतर ती काही गोष्टीत असते तशी वाईट्ट चेटकीण नव्हतीच. पण ती नेहमी काही ना काही जादू करत असायची. त्यामुळे तिला सगळेजण चेटकीण म्हणत. तर ही चांगली चेटकीण रोज आपल्या घरामागच्या अंगणात बसून कसले कसले रस काढी. चूर्ण बनवी. त्यावर मंत्र म्हणी. मग आपल्या लांबलांब नाकानं त्यांचा वास घेई. सगळं छान जमून आलं, की आपल्या झाडांना आणि आजूबाजूच्या प्राणीपक्ष्यांना ते खायला घाली. मग हे प्राणी, पक्षी चांगले निरोगी आणि धष्टपुष्ट होत. झाडेसुद्धा छान फुलंफळं देत. कधीकधीतर आजारी प्राणी मुद्दाम दूरवरून तिच्याकडे येत.

लेखन प्रकार: 

टोपीचा बनी आणि बनीची टोपी

एकदा एका लाल टोपीला खूप म्हणजे खूपच कंटाळा आला. ह्हे क्काय! दुकानात कुठेतरी कपाटात एखाद्या गठ्ठ्यात पडून राहायचं आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून दिसेल तेवढंच जग बघायचं?

तिच्या मनात विचार आला 'कशी असेल या दुकानाबाहेरची दुनिया? मज्जा असेल खूप सारी? की कंटाळवाणी असेल?'

दुकानाच्या बाहेर लटकणार्‍या दोरीवर दुपारच्या वेळी येऊन बसणार्‍या चिमणीताईकडूनतर तिला नेहमी गमतीजमतीच्या गोष्टी कळायच्या. तेव्हापासून ती वाट बघायची, लवकरात लवकर आपली कोणी तरी निवड करावी आणि मग ह्या एकाच जागी बसण्यातून आपली सुटका व्हावी.

लेखन प्रकार: 

निमाचा निमो

'नि

मोचा पिक्चर' पाहिल्यावर मी अगदी ठरवूनच टाकलं की बाबांना सांगायचं, "मला निमो पाहिजे!" म्हणून.

पण बाबांना सांगितल्यावर ते म्हणायला लागले, की "अगंऽ.. निमो तुझ्यासोबत रहायला आलाऽ, तर मग त्याच्या बाबांना चैन पडेल का? रात्र झाली की मग निमो इथे आपल्या घरात रडत बसेल आणि निमोचे बाबा तिकडे समुद्रात. मग???"

"होईल हो सवय त्यालाही" मी म्हटलं तसे बाबा अचानक उठून निघूनच गेले.

लेखन प्रकार: 

प्रकाशाची फुले

हि

का आणि पिका दोघेजण रात्री चांदण्या बघत अंगणात लोळत होते. चांदण्या बघणे हा या दोघांचा आवडता छंद. रात्र झाली की अंगणात गवताची चटई पसरुन ही दोघे बहीणभाऊ चांदण्या बघत बसायचे.
"आपल्याकडे पण असे सुंदर चमकणारे तारे असते तर किती बरं झालं असतं ना?" हिकाने विचारलं.
"हो ना गं. मग आपण चांदण्यांशी खेळलो असतो. त्यांना हातात घेतलं असतं. " पिका म्हणाला.

लेखन प्रकार: 

तळ्यातली कमळे

आता बकुळीची फुलं त्यांची इच्छा होईल तेव्हा झाडावरून खाली भिरभिरत पडतात. छोटीछोटी मुलंमुली फुलं वेचून त्यांचे हार आणि गजरे करतात. नीट बघितलत ना तर कळेल की ही बकुळीची फुलं त्या कमळांसारखीच आहेत.

borderpng.png

लेखन प्रकार: 

डॉक्टर विसरभोळे

नर्स झोपेबाईंनी कपाळावर हात मारला. रोजच्याप्रमाणेच! घड्याळात नुकतेच दहा वाजत होते. पण नेहमीप्रमाणेच कोणता काटा कुठे आहे ते विसरून, बारा वाजायला आले असं समजून, डॉक्टर जेवायला घरी निघून गेले होते.

borderpng.png

"हं.

हे घ्या पर्सबाई. हे दातांचं औषध त्या वाघ्यासाठी." डॉक्टर म्हणाले. त्यांनी एक पुडी नर्सबाईंच्या हातात दिली. मग भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं.

लेखन प्रकार: 

वटवृक्ष आणि गवत

अशा गर्विष्ठ झालेल्या वडाला मग गवताशी कोणीही मैत्री केलेली चालेनाशी झाली. मुलांनी गवतावर लोळण घेणं त्याला सहन होईना. त्याच्या फांदीएवढीदेखील उंची नसलेल्या गवताची फुलपाखरांनी विचारपूस करावी हे ही त्याला बघवेना. गवताबरोबर खेळून त्याच्यापाशी आलेल्या फुलपाखरांना तो हाकलून लावी.....

border2.JPG

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

थेंबाचा प्रवास

नवनवीन जंगल, नवनवीन प्राणी बघून तो अगदी हरखून गेला. आता त्याला मोठमोठे मासे भेटले पाण्यात. मासे म्हणाले, "आम्ही समुद्रपण पाहिलाय. खूपच मोठ्ठा असतो तो. ही आपली नदी समुद्रातच जाणार आहे बरं वाहात वाहात.." हे ऐकून थेंबाला कधी एकदा समुद्रात जातो असं झालं. हळूहळू नदीचं पाणी खारट झालं, थेंबसुद्धा खारट झाला आणि मग अचानक प्रचंड मोठ्या समुद्रात थेंबाने प्रवेश केला.

border2.JPG

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

सात पर्‍यांची कहाणी

पर्‍यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि त्या उठून बसल्या. घाबरल्या.. बावरल्या.. एकमेकींना विचारू लागल्या,"हे कोण? हा कसला आवाज? अगंबाई, किती उशीर झाला! आपल्याला घरी गेलं पाहिजे. चला, चला, किरणावर चढा.."
त्या हळूच पाण्याबाहेर आल्या.. सूर्यकिरणांवर चढू लागल्या.. पण त्यांना थोडा उशीर झाला होता.. पहाटेचा पहिला किरण कधीच निघून गेला होता. आता त्यांना काही किरणांवर चढता येईना!

border2.JPG

फा

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: