निसर्गायण

निसर्गायण

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

वाइनची कुळकथा

शातों पेत्रुस ही आणखी एक रेड वाइन. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही वाइन बनवणारे उत्पादक द्राक्षाच्या एका वेलीवर फक्त आठच घड ठेवतात. म्हणजे कळी अवस्थेतच इतर घड खुडतात. ही वाइन अठ्ठावीस एकर जागेच्या द्राक्षबागेपासून बनते. एवढ्या काटेकोरपणे कुटुंबनियोजन केल्यामुळे मर्यादित प्रमाणातच वाइन तयार होते. पण गुणवत्तापूर्ण असते. इथेही संख्येला महत्व आहे. म्हणजे एका वेलीवर एकच घड, अठ्ठावीस एकरच जागा आणि खुडायलाही एकशेऐंशी माणसं!

border2.JPG

कि

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

बळी

त्यानं एक नजर समोरच्या प्रत्येकावर फिरवली. एखादा क्षण तो जैनांना नजर मिळवून थांबला. मग ग्लासमधून पाण्याचा एक घोट घेऊन बोलू लागला, "मिटिगेशन! कशाचं? आपण इथं अशा विशिष्ट प्रदेशाचा विचार करतोय की जिथली पायाभूत नैसर्गिक रचनाच सुरू होते ती एरवी फुटकळ वाटणार्‍या कारवीपासून. अर्थातच, प्रत्येक परिसंस्थेची पायाभूत रचना अशीच असते. तिच्या र्‍हासाची भरपाई कशी करणार? वुई वुईल बिकम अनदर "नेचर", इफ वी कुड डू धिस...", नेचर शब्दावर भर देत तो म्हणाला.

border2.JPG
लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

केल्याने देशाटन (कॅमेरा)

वा

रेमाप आणि वैविध्यपूर्ण सृष्टिसौंदर्य बहाल झालेल्या आपल्या देशाची सफर घडवून आणल्याशिवाय 'निसर्गायण' पुरे कसे व्हावे? निसर्गवाचनाला भौगोलिक सीमारेषांची अट नसली, तरी मनीमानसी रुजलेल्या (स्व)देशभानात सर्वांत मोठा वाटा निसर्गचित्रांचा.
हीच ती अपूर्वाई आपल्या देशाची, मातीची! देशातील प्रत्येक प्रांताचे केवळ नैसर्गिक वैभव डोळेभरून पाहायचे म्हटले तरी किती कालावधी लागेल...

तूर्तास आपल्या देशातील चार प्रांतांची ही 'स्वतंत्र हिरवी अभिव्यक्ती'*. विराट आकाश आणि जलप्रपात पाहूया चंदन मोगरे यांच्या कॅमेर्‍यातून...

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

मिथक

अजय दगडाच्या आडोशाने झोपला होता. हे शरीर नवीन होते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक श्वास वेगळा होता; मोकळा होता. स्नेहा गेली हे आयुष्याला पडलेले भगदाड कसे बुजवावे हे समजत नव्हते. प्रत्येक पानाचे, प्रत्येक पक्ष्याचे बारकाईने निरीक्षण करण्याचा चाळा लागला होता. नकळत त्याचे कान बारीक आवाज टिपत होते. रात्रीच्या काळोखात सजीव, निर्जीव या सगळ्यांमध्येच काहीकाही बदलत जाते आणि दुसर्‍या दिवशी उजाडलेल्या प्रकाशात लखलखणारे जग सर्वस्वी नवे, निराळे असते.

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

बागवासरी

पहाटे तीनच्या सुमाराला अचानक जाग आली. ब्राह्ममुहूर्त म्हणतात तो हाच का? बाहेर चांदणं निवांत पसरलं होतं. चांदण्याच्या एका पारदर्शी रंगात सगळ्या पानाफुलांचा 'अवघा एक रंग' झाला होता. सावल्याही चांदण्यात माखून गेल्या होत्या. बाहेर माडाच्या झावळ्यांतून चांदणं झिरपत होतं. खिडक्यांतून चांदण्याचे ओहोळ घरात आले होते. आम्ही नीरवतेला न जागवता, हलक्या पावलांनी बाहेर आलो. सुखद गारव्याची चाहूल आणि पायाखालची ओलसर चांदवळ! अवघा परिसर ब्रह्मरुप.

border2.JPG

प्र

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

पर्यावरण, संशोधन आणि मी...

वनखात्याला नुसतीच नावं ठेवण्यापेक्षा लोकांनी काही मदत केली तर खूप जास्त सकारात्मक काहीतरी होऊ शकेल. मला प्रामुख्याने वाटतंय ज्या लोकांना थोडासा कळवळा आहे या सगळ्यांबद्दल, त्यांनी सरकारी लोक किंवा यासंदर्भात धोरणं आखणार्‍या लोकांबरोबर काम केलं तर बर्‍याच गोष्टी होऊ शकतील. वनखातं काही गोष्टी करू शकतं ज्या लोक करू शकणार नाहीत आणि लोक काही गोष्टी करू शकतात ज्या सरकारी खात्यांमधून सहजपणे नाही होऊ शकणार. त्यामुळे जर हे दोन्ही गट एकत्र आले तर काहीतरी आशेचा किरण आहे.

border2.JPG
लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

सरणार कधी...

गाडी बाहेर काढायला त्याला किमान अर्धं मिनिट तरी लागणार होतं.
तेवढ्या वेळातच तीनही इमारतींचा डोलारा जमीनदोस्त झाला तर... ज्याच्या भीतीपोटी गेले दोन तास आपण इथे असे उभ्याउभ्या घालवले? त्या पंचवीस-तीस सेकंदांच्या अवधीतच धरणीमातेला तिच्या पोटातली खदखद असह्य झाली तर..........?
दोन तासांपूर्वीच्या त्या घबराटीनं पुन्हा एकदा सारिकाचा ताबा घेतला...

border2.JPG

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

वटवृक्ष आणि गवत

अशा गर्विष्ठ झालेल्या वडाला मग गवताशी कोणीही मैत्री केलेली चालेनाशी झाली. मुलांनी गवतावर लोळण घेणं त्याला सहन होईना. त्याच्या फांदीएवढीदेखील उंची नसलेल्या गवताची फुलपाखरांनी विचारपूस करावी हे ही त्याला बघवेना. गवताबरोबर खेळून त्याच्यापाशी आलेल्या फुलपाखरांना तो हाकलून लावी.....

border2.JPG

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: