निसर्गायण

केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार...

याची पहिली पंधरा वर्षं पालघरजवळच्या एका गावी काढल्याने त्यावेळी माझ्यासाठी माझा देश म्हणजे, पालघर आणि आसपासचा परिसर, एवढाच होता. मात्र निसर्गानं या परिसराला भरभरुन दिलंय. गावाजवळून वाहणारी सूर्या नदी, पूर्व-पश्चिम दोन्ही दिशांना डोंगर आणि टेकड्या, जवळच केळवे, सातपाटीचा समुद्र... त्यामुळे निसर्गाशी जवळीक आपसूकच झाली.

पुढे कॉलेज आणि इंजिनीअरिंगसाठी मुंबईला आल्यावर मात्र हा देश, हे जग फार मोठं असल्याचा साक्षात्कार झाला. त्यावेळी ट्रेकिंगचा चांगला ग्रूप जमला आणि आजूबाजूचे छोटेमोठे ट्रेक केले. यामध्येच कधीतरी फोटोग्राफी आणि चित्रकलेचा छंद जडला.

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

लेह-लडाख मधील ढगफुटी

खिडकीतून बाहेर बघण्याचेही धाडस होत नव्हते. कोणत्याही क्षणी आमच्या घराचे छत उडून जाईल असे वाटत होते. अजस्र अशा हिमालयाच्या पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर तो पावसाचा धुमाकूळ मनात अक्षरश: धडकी भरवत होता. अत्यंत रौद्र स्वरूप धारण केलेल्या पावसाने आता कोणलीही दयामाया न दाखवता निर्दयीपणाने आपल्या अमानवी शक्तीचे जणू प्रात्यक्षिकच मांडले होते.

border2.JPG

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

गंगेच्या काठी

मावळत्या सूर्याच्या साक्षीने, सहस्र ज्योतींच्या प्रकाशात गंगेचे स्तवन करणारे मंत्रघोष, दुमदुमणारा गंभीर घंटानाद, प्रवाहात फुलांनी सजवलेल्या द्रोणांतून सोडलेले असंख्य दिवे, वातावरणात भरून राहिलेला कापूर-चंदनाचा सुगंध.... पंचेंद्रिये तृप्त व्हायची. बसल्या जागी आपोआप डोळे मिटायचे. मन स्थिर व्हायचे. एक गहिरी शांती अंतर्यामी दाटून यायची.

border2.JPG

ति

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

निसर्गशिल्प

"ये पौधें, ये पत्तें, ये फूल, ये हवाऍं
मुझको बुलाए, दिल को लुभाए, मन कहें मैं झूमूँ, झूमूँ मैं गाऊँ......"

शीच काहीशी अवस्था होते माझी निसर्गात फिरताना, त्याच्यासोबत रमताना. सह्याद्रीत फिरताना, रानावनात भटकताना त्याची विविध रुपे पाहिली आहेत, कधी रौद्रभीषण तर कुठे नाजूकश्या कलाकुसरीच्या रुपात. निसर्गाची आवड लहानपणापासूनच. पुढे त्याला जोड लाभली ती भटकंतीची आणि फोटोग्राफीची. या छंदामुळेच त्याला जवळून पाहता आले, त्याची विशालता अनुभवता आली.

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

नैसर्गिक भरार्‍या

एकट्याने भरार्‍या मारणे (आणि वेगळे/उंच उडणे) यात काहीच वावगे नाही. उंच/वरती हेच नेहमी योग्य असेल असे नाही, पण वेगळे असणे वाईट नाही. खरेतर प्रगतीचा तोच एक (खरा) मार्ग आहे. निसर्ग दिशाहीन असतो, पण आपले छोटे आयुष्य पाहता आपण आपले ध्येय ठरवायला हरकत नसावी.

All perfection comes from within, and the perfection that is imposed from without is as frivolous and stupid as the trimmings on gingercake. The free man may be bad, but only the free man can be good. And all the kingdom and the glory - call it of God, call it of Cosmos - must arise from the free will of man.

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

मी, तीनशे किलोंचे धूड आणि एक सप्ताहांत

योसेमिटे हे पार्क जवळपास बाराशे चौ. मैलांवर पसरलेलं आहे. नयनरम्य धबधबे, श्वास रोखून धरायला लावणारा निसर्ग, जंगली जनावरं आणि रोज भेट देणारी माझ्यासारखी असंख्य टाळकी यांसाठी ते प्रसिद्ध आहे. हायकिंगची मजा लुटण्यासाठी फार चांगलं ठिकाण आहे. मर्क नदी व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. पाचव्या स्तरापर्यंत तेथे राफ्टिंग करता येतं.

border2.JPG

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर ...

पहाटे सहा वाजता उठून तयार झालो. बरोब्बर सात वाजता पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने प्रदक्षिणेसाठी गड सोडला आणि तो छोटासा कडा उतरून कारवीच्या वाटेवर लागलो.. पुढे-मागे सोबत प्रदक्षिणार्थी होतेच. कारवी संपली तिथून उजव्या हाताला आत शिरलो आणि प्रदक्षिणा सुरू झाली. समोर दूरवर 'सुवेळा माची'चे टोक दिसत होते.. अंदाज बांधला.. तिथपर्यंत पोचायला किमान दोन तास तरी लागणार.

border2.JPG

रा

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

रंगवूनी आसमंत..

मग दरवर्षीची माझी एक ठरलेली फुजी ट्रिप असतेच. शरदरंगात नटलेला हा पर्वतराज दरवर्षी वेगळी रुपं दाखवतो. कधी धुक्याची मलमल, तर कधी क्षितिजाला कवेत घेणारा निळाभोर रंग. ही निळाई अनंताची. त्या निळाईला स्पर्श करायला मान उंच करणारे पिवळे-केशरी सेडार वृक्ष, लाल मॅपल. ज­णू या तीन मूळ रंगांमधूनच सृष्टीला रंगवून काढलं असावं.

border2.JPG

रं

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

थेंबाचा प्रवास

नवनवीन जंगल, नवनवीन प्राणी बघून तो अगदी हरखून गेला. आता त्याला मोठमोठे मासे भेटले पाण्यात. मासे म्हणाले, "आम्ही समुद्रपण पाहिलाय. खूपच मोठ्ठा असतो तो. ही आपली नदी समुद्रातच जाणार आहे बरं वाहात वाहात.." हे ऐकून थेंबाला कधी एकदा समुद्रात जातो असं झालं. हळूहळू नदीचं पाणी खारट झालं, थेंबसुद्धा खारट झाला आणि मग अचानक प्रचंड मोठ्या समुद्रात थेंबाने प्रवेश केला.

border2.JPG

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

सात पर्‍यांची कहाणी

पर्‍यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि त्या उठून बसल्या. घाबरल्या.. बावरल्या.. एकमेकींना विचारू लागल्या,"हे कोण? हा कसला आवाज? अगंबाई, किती उशीर झाला! आपल्याला घरी गेलं पाहिजे. चला, चला, किरणावर चढा.."
त्या हळूच पाण्याबाहेर आल्या.. सूर्यकिरणांवर चढू लागल्या.. पण त्यांना थोडा उशीर झाला होता.. पहाटेचा पहिला किरण कधीच निघून गेला होता. आता त्यांना काही किरणांवर चढता येईना!

border2.JPG

फा

लेखन प्रकार: 
Taxonomy upgrade extras: