ललित

कविता गेली खड्ड्यात...!

अशी कशी ही माझी आई! अशी कशी ही माझी आई!

पहावे तेव्हा मागे-मागे करते, दिवसात दहा कामे सांगते,
‘नाही’ म्हणायची सोय नसते, कपाळावर तिच्या आठी असते.

हे खा, ते खा, कटकट करते, डब्यात नेमकी पोळी-भाजी देते,
भजी-वडे कधीतरीच करते, पिझ्झाच्या ‘पि’लाच डोळे वटारते.

सारखे शिस्तीचे धडे शिकवते, खोलीतला पसारा आवरायला लावते,
स्वतः रविवारी सोफ्यात रेलून, पेपर वाचत टी.व्ही. बघते!!

अशी कशी बरं माझी आई! अशी कशी बरं माझी आई!

कपाट माझं आवरून ठेवते, हरवलेली वस्तू शोधून देते,
लेखन प्रकार: 

स्वयंपाकातील विठोबा

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! पण मला माझ्या आवडत्या पाट्यावरवंट्याच्या बाबतीत एक म्हण तयार करावीशी वाटते - पाट्यावरवंट्यावर जिन्नसे रगडिता रूचिरस पाझरे'. हसू नका, पण बिचार्‍या पाट्यावरवंट्यावर मी कुठले गाणे ऐकले नाही, कुठली चांगली म्हण ऐकली नाही, म्हणून हा प्रयत्न.

पाट्यावरवंट्याची जोडी दिसायला काळी कुळकुळीत. जणू विठोबारखुमाईची जोडी. पाट्याचा आकारही मंदिरासारखा किंवा कौलारू घरासारखा. वरवंटाही अगदी लांबट गरगरीत. पूर्वी प्रत्येकाच्या घरात त्यांच्या ऐपतीनुसार किंवा आवडीनुसार पाट्यावरवंट्याचे छोटे किंवा मोठे आकारमान ठरलेले असायचे.

लेखन प्रकार: 

निवृत्ती २०३१

माननीय विश्वस्त, प्रिय सहकारी शिक्षक, पालक आणि मैदानातल्या आणि स्क्रीनवरच्या माझ्या माजी-मुलांनो,
या मंचावरून माझा शेवटचा नमस्कार.

आज १ मार्च २०३१. तब्बल वीस वर्ष कोणालातरी ‘शिकवायचं’ या हेतूनं मी या वास्तूमध्ये रमले, आणि निवृत्तीच्या दिवशी हे खुल्या दिलानं मान्य करते, की जेवढं शिकवू शकले त्यापेक्षा कैक पटींनी जास्त शिकून चालले आहे. मला वाटलं होतं पंचेचाळीशीत बी.एड करून या शाळेत शिकवणं, म्हणजे शिकवण्यासाठी जेमतेम दहा-बारा वर्षं आहेत माझ्या हातात. अर्थात, सध्याच्या पेन्शनच्या तर्‍हा आणि नखरे लक्षात घेता मी वयाची पासष्ठ वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्त होते आहे, यात काही नवल नाही!

लेखन प्रकार: 

वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट

१९७५ - १९७६, माझे कॉलेजकाळातील दिवस आणि कोल्हापूर शहर म्हणजे मुंबईपुण्याप्रमाणे इंग्रजी चित्रपटघरांचे माहेरघर जरी बनले नसले, तरी उमा आणि पार्वती या दोन सुंदर चित्रपटगृहांत नित्यनेमाने इंग्रजी चित्रपट लागायचे. ते राहायचे साधारण एक आठवड्याच्या मुक्कामासाठी, मात्र ज्यांना 'लोकप्रिय’ गटात गणले जात असे, ते मात्र तब्बल चार आठवडे आपला मुक्काम हलवत नसत आणि मग वितरकाच्या दृष्टीने ’मॅकेनाज गोल्ड’, ’साऊंड ऑफ म्युझिक’, तमाम जेम्स बॉण्डपट आदी म्हणजे गल्ल्याच्या नजरेत दूज का चाँदच.

लेखन प्रकार: 

जनुकीय दैववादाचा अजब नमुना

११० वर्षांच्या आजींच्या तब्येतीचे रहस्य त्यांच्या जनुकांत.'
'ऑलिंपिकमधील उत्तम यशाकरता चिनी खेळाडूंच्या जनुकांत फेरफार केल्याचे आरोप.'
'मला मॅथ्स कसे येणार, माझ्या घराण्यात ते कुणाला जमत नाही, इट्स काइंड ऑफ जेनेटिकल यू नो...'

लेखन प्रकार: 

रहस्य एका विमान अपहरणाचे...

हे एक असे अपहरणनाट्य ज्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न अमेरिकन तपासयंत्रणा गेल्या ४२ वर्षांपासून करीत आहेत. अमेरिकेत आजपर्यंत झालेल्या विमान अपहरणांपैकी हे असे एकमेव अपहरण आहे, की ज्याचे रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहे. २४ नोव्हेंबर, १९७१ या दिवशी घडलेल्या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरूच आहे. काय झाले होते त्या दिवशी?

लेखन प्रकार: 

अ ’मेसी’ अफेयर

’सैन्य पोटावर चालते’ म्हणतात, हे अगदी खरे आहे. भारतीय सैन्यदलातील एका अधिकार्‍याशी लग्न करून आल्यावर काही दिवसांतच मला याची प्रचीती आली. लग्नाआधी होणार्‍या नवर्‍याकडून युनिट मेसबद्दल खूप ऐकले होते. हे नक्की काय प्रकरण असते, हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती आणि हळूहळू लक्षात आले की, आर्मीमध्ये ’मेस’ या ठिकाणाला विशेष महत्त्व असते. ’मेस’ ही एक जणू ’संस्था’च असते, जी एका अधिकार्‍याच्या आयुष्यात फारच महत्त्वाची भूमिका बजावते. युनिटमधल्या अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सामाजिक जीवन हे ’मेस’शी निगडित असते.

लेखन प्रकार: 

रवीन्द्रसंगीतात भेटलेला शरद ऋतू

RabindraSangeet-Tagore.gif

"आ

ज पहिल्या फुलाचं बाळलेणं मिळणारेय - म्हणून पहाटे पहाटे उठतोय."
"आज पहिल्या प्रकाशाचं गूज कळणारेय - म्हणून हुंदडत सुटतोय!"

लेखन प्रकार: