कथा

गंध

नवरा गेलाय फिरतीवर, दुसर्‍या शहरात. घरात मी एकटीच. आता एकटीसाठी काय जेवायला करायचं? साधी खिचडी टाकावी म्हणून मी डाळ-तांदूळ धुऊन पातेलं गॅसवर ठेऊन फोडणी केली तितक्यात.....

डिंग-डाँग.. डिंग-डाँग.. डिंग-डाँग.. डिंग-डाँग.. डिंग-डाँग.....................

पाचवेळा इतक्या घाईघाईने म्हणजे मनूच ती! तिला धीर धरवणार नाही. धावत जाऊन मी दार उघडलं.

"मावशी, बघ गं कसं काय जमलंय मला ते!" दार उघडल्या उघडल्या तिनं काढलेलं गुलाबाच्या फुलाचं सुरेख चित्रं मनूनं माझ्या डोळ्यांसमोर नाचवलं.

लेखन प्रकार: 

'डुप्लिकेट' लोकशाही

बबन्यानं दुकानाचं दार आपल्याकडे ओढून कडी, कुलूप काढलं. दुकान उघडून मेजावर, खुर्चीवर आणि सामानावर फडकं मारुन तो फतकल मारीत लाकडाच्या खुर्चीत बसला. आज दुकान उघडायला जरा उशीरच झाला होता.आपलं रोजचं गिऱ्हाईक लांब असलेल्या दुसऱ्या दुकानात गेलं कि काय अशी शंकाहि त्याच्या मनात आली. पण लगेच त्याच्या दुसऱ्या मनाने त्याची शंका खोडून काढली. कारण त्या दुकानात उधारी चालत नसे. बबनराव बऱ्यापैकि उधारी ठेवत म्हणून गावकरी बबन्याच्याच दुकानात जास्त जात. दुकान उघडायला जरा उशीर झाला तरी जरा कड काढतंच.

आता खेड्यातलं दुकान म्हणल्यावर त्यात विकायला दुसरं काय असणार साखऱ्या अन् पत्ति.

लेखन प्रकार: 

लाल परी

लेखन प्रकार: 

पाश

"पैकं भरून टाका सायबांचं." दरडावलेला आवाज ऐकून शरद सावध झाला.
"कोण बोलतंय? आणि हळू बोला. ओरडू नका."
"आमदार निवासात वस्तीला व्हता नवं तुजा भाव. त्यो पैका भरून टाक पटकीनी असं म्हनतोय मी."
"एकेरीवर येऊ नका आणि आधी कोण बोलताय ते सांगा. माझा भाऊ आमदार निवासात रहात नाही."
"रहात व्हऽऽऽता. तुज्याकडं जो आकडा येईल तेवढा पैका भरून टाकायचा. माझा काही संबंद नाही असं म्हनायचं नाय. कललं? कललं का नाय तुला मी काय बोलून राह्यलो त्ये?"
"हे बघा. मी पोलिसांकडे तक्रार नोंदवतो तुमची. बसा मग खडी फोडत म्हणजे समजेल."

लेखन प्रकार: 

शोध

बस सोल्ल्याच्या फाट्यावर थांबली. घाईघाईत सुयशने रहस्यकथेचं पुस्तक सॅकमध्ये ठेवलं. निखिल, त्याचा मामेभाऊ त्याला घ्यायला आला होता.
"आयला तू अगदी हीरोच दिसतोस."
"म्हणजे कसा?" सुयशने केसाची झुलपं उडवित विचारलं.
"ए, लगेच भाव खाऊ नकोस. चल आता."
"कसं जायचं?" सॅक पाठीवर अडकवून सुयश तयार होता.
"चालत. अर्ध्या तासात पोचू."
"ठीक आहे. चल ना मग." दोघं लांब लांब ढांगा टाकत चालायला लागले.

लेखन प्रकार: 

जेव्हा शवपेट्या नाचू लागतात......

बार्बाडोस!

वेस्ट इंडीज द्वीपसमुहातील हा एक छोटासा बेटवजा देश. जेमतेम २१ मैल लांब आणि १४ मैल रुंद असलेलं हे बेट उत्तर अटलांटीक महासागराच्या पश्चिम भागात विनवर्ड बेटं आणि कॅरेबियन समुद्राच्या पूर्वेला सुमारे १०० मैलांवर आहे. क्रिकेटच्या दुनियेत केन्सींग्टन ओव्हल हे ब्रिजटाऊनमधील मैदान सुप्रसिध्द आहे. 'थ्री डब्ल्यूज' या नावाने ओळखले जाणारे फ्रँक वॉरेल, क्लाईड वॉलकॉट आणि एव्हर्टन वीक्स, सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर गॅरी सोबर्स, गॉर्डन ग्रिनीज आणि जगभराच्या बॅट्समनना धडकी भरवणारे वेस हॉल, चार्ली ग्रिफीथ, माल्कम मार्शल आणि 'बिग बर्ड' जोएल गार्नर हे सर्व जण बार्बाडोसचेच!

लेखन प्रकार: 

अंतरीच्या गूढ गर्भी

सुमारे तासभर वेटिंग रूममध्ये थांबल्यानंतर अनुया आणि तिच्या सासूबाईंना डॉ. म्हात्रेंच्या खोलीत प्रवेश मिळाला. त्यांचा दवाखाना तसा दवाखाना वाटावा असा नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे तिथे शांतता होती खूपच. इतर पेशंट नव्हते, त्या दोघीच होत्या. काऊन्टरवर एक त्या वातावरणाला शोभून दिसेल अशी शांत हसतमुख रिसेप्शनिस्ट होती. अनुया वेळेच्या आधीच पंधरा मिनिटं आली म्हणून तिने तिला बसायला सांगितलं होतं. नंतर आतल्या पेशन्टला वेळ लागायला लागला, तशी त्यांची माफीही मागितली होती. बसायला प्रशस्त जागा, वाचायला ताजी मासिकं आणि कोरे कागद असलेलं एक पॅडही होतं. टेबलच्या पायाला बांधलेली दोन पेनंही होती.

लेखन प्रकार: 

ती, तो आणि... थोडासा उशीर!!!

"ए ते बघ तिथे ते आजी-आजोबा. खी खी खी खी."
रस्त्यावरून जाताजाता एक पोरगी त्या दोघांकडे पाहून तिच्या हीरोच्या कानात हळूच कुजबुजली. तिचं कुजबुजणं त्या दोघांना ऐकू जाईल इतपत मोठ्या आवाजातलं होतं, हे तिच्या हीरोला जाणवलं आणि किंचित घाईनं तिला दूर घेऊन जाताजाता ते दोघंही मनमुराद खिदळताना त्या दोघांनीही पाहिले. तो हसला. ती मात्र काहीशी कावरीबावरी झाली. तिच्याकडे पाहून तो पुन्हा हसला.

2013_HDA-Ti_to_AniThoDasaUshir.jpg

लेखन प्रकार: