कथा

वादळ

“अरे आता तू घरात कशी काय?” समीरने त्याच्याकडच्या चावीनं लॉक उघडलं आणि अनपेक्षितरीत्या मन्वा समोर बसलेली पाहून तो जवळजवळ दचकला. “तू आज कोलकत्याला जाणार होतीस ना?”
“फ्लाईट कॅन्सल झाली. एअरपोर्टवरून परत आले.” मन्वा हातातल्या पुस्तकावरून नजर न काढता म्हणाली. त्यानं विचारलं, “कशामुळे? ओह, ते दुपारी काहीतरी वादळाची सूचना वगैरे दिली होती... त्यामुळे का?”
“हो. काहीतरी वादळाची दिशा बदलली...” मन्वा नाराजीने म्हणाली.

लेखन प्रकार: 

अ डिनर विथ ग्रॅनी

ट्रिर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्ंग!!

विनीनं जोर एकवटून दाराची बेल वाजवली. खरंतर तिला त्याचाही कंटाळा आला होता. आधीच ट्रेनचा दगदगीचा प्रवास, त्यात स्टेशनवर उतरल्यावर रिक्शासाठी पळापळ. अगदीच उबायला होत असे विनीला. संध्याकाळी सहानंतर तिची बॅटरी अगदीच डाउन होई. आताशा तिला ऑफिसचा मनस्वी कंटाळा येऊ लागला होता. दुसरं काही करायला वेळच मिळत नसे. या ऑफिसच्या तर ना..... मनोमन वैतागलीच ती.

लेखन प्रकार: 

गोदाई

चुळूकझुळूक आवाजानं तिला जाग आली. पत्र्याच्या भिंती, छत आणि दारसुद्धा पत्र्याचंच. तिनं हात कडीजवळ नेला, तसा तिच्या आरपार पसरलेल्या एकटेपणात खडखडाट झाला. थरथरत्या हातानं तिनं दार उघडलं. वयाच्या ओझ्यानं वाकलेलं शरीर हातातल्या काठीनं तोलत ती बाहेर आली. गार वार्‍यानं तिच्या सुरकुतलेल्या कातडीवर टिंबांची नक्षी भरली होती. अंगावरच्या धुडक्यासोबत केसांची चांदी सावरत आभाळभर पसरलेल्या देवांना तिनं नमस्कार केला.

2013_HDA_Godaaee.JPG

"बाई सकाळं सकाळं माहा झाडण्याचा पाटं

लेखन प्रकार: 

एका किन्नराची ट्रान्सफर.

"बाबा, बेड नंबर टूवरची आज्जी साडेअकराच्या आत वॉर्ड नाईन्टीनमध्ये जायला हवी, विदाऊट फेल. कल सुबह एक डेअरी मिल्क पक्की", सीतेने विनवणीपूर्वक बाबाला म्हणजे वॉर्डमधल्या शिकाऊ नर्सला बजावले. आज पोस्ट इमर्ज दिवस. काल चोवीस तास जागून आज पुन्हा दोन वाजेपर्यंत काम असणार. दुपारी किमान दोन तास झोप हवीच. आज दुपारी वीकली जर्नल मीट आहे. मागच्या वेळी जायला जमलं नव्हतं. यावेळीतरी जमतं का बघायला हवं. पुढच्या वीकमध्ये तर आपल्याच युनिटची टर्न आहे.

लेखन प्रकार: 

सजाण

आमच्या घरातून बाहेर पडलं, की रस्त्यावर कुण्णीच नसतं. रस्त्यावरचं पहिलंच घर आमचं, थोडंसं चाललं की रस्ताच वळतो. मग एकदम गर्दी, गडबड, दुकानंच दुकानं. रोजच्यासारखंच आईनं माझं बोट घट्ट धरलं होतं. मी ते सोडवलं की ती पुन्हा धरते. ऐकत नाही अगदी. आई नेहमीसारखी घाईघाईत मला काकूंकडे पोचवायला चालली होती. तिथून तिला कामावर जायचं होतं. मला उड्या मारत, काचेच्या खिडकीतून दुकानांच्या आत बघायचं होतं. टेडी बेअर, मिकी माऊसचं जे दुकान आहे ना, ते मला खूप आवडतं. मी तिथे थांबतेच. मग आई पुन्हा हात धरून ओढते. आजही आईने तसंच केलं. तिच्या मागेमागे जाताना त्या दुकानाच्या समोर एक मुलगा बसला होता तो दिसला.

लेखन प्रकार: 

वो कौन था?

एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक संध्याकाळ...
ऑफिसातून घरी आलो नि सोफ्यावर बसून पायातील मोजे काढत असतानाच आपल्या पिठानं माखलेल्या हातात पाण्याचा पेला घेऊन आलेल्या सौ.ला पाहताच मी बुचकळ्यात पडलो.
तसं तर काही हवं असेल तेव्हाच सौ.ला सोयिस्करपणे पत्निधर्म आठवतो. नाहीतर एरवी ती 'जगातील नवरे स्वत:ची कामे स्वत: कसे करतात', हे मला ऐकवण्यात धन्यता मानते.
"अगं हातातलं काम टाकून माझ्यासाठी पाणी आणण्याचा त्रास कशाला उगी करून घ्यायचा?" पेल्यातील पाणी पिऊन होताच जरा हुशारी आल्यावर मी सौ.ला विचारले.
"यात कसला आलाय त्रास!" असं म्हणून सोफ्यामागे उभी राहत सौ. नं आपले पिठातले हात माझ्या गळ्यात टाकले.

लेखन प्रकार: 

रनेसाँस ३०१३

स्पेस कॅप्स्यूल थांबल्याचं अन्वयाला कळलं, कारण अंतराळातून आल्यासारखे पाझरणारे ते मनोहारी सूर अचानक थांबले होते. गेले तीन दिवस मधूनमधून लागलेली झोप वगळता ते सूरच तिची सोबत करत होते. ते सूर इतके स्वर्गीय होते, की तिला प्रवासाचं, त्यातल्या चिंतांचं भानच हरपल्यासारखं झालं होतं.
"प्रवास संपला. आता उतर अन्वया."
अन्वयाच्या मनात हे शब्द स्पष्ट आदेशासारखे उमटले. ते ध्वनिलहरीसारखे नव्हते, तर विचारलहरीसारखे होते. खरं तर विचारांचं प्रक्षेपणच होतं ते. तिला आता या असल्या 'शब्देवीण संवादु'ची सवय झाली होती.

लेखन प्रकार: 

जाण

भकास माळरान आणि मध्येच दिसणारी हिरवळ मागे पडून आता काँक्रिटच्या जंगलात गाडी शिरत होती. ऊर्जामंत्री विश्वासराव पाटील मात्र फायलीतच गुंग होते. आज कसंही करून कॉलेजला मान्यता मिळवूनच मुख्यमंत्र्यांची केबिन सोडायची, हे त्यांनी मनोमन ठरवलं होतं. पण एकदम गाडी थांबली अन् ते भानावर आले.
"काय रे, काय झालं?"
"दादा, जाम आहे वाटते."
"उतरून पाहा जरा... "

लेखन प्रकार: 

पंढरीकाका अन् तबल्याची भाषा

मा

झ्या अडनिड्या वयातली ही गोष्ट. म्हणजे आपल्याला बरंच काही येतंय, समजतंय अशा गैरसमजातले हे काही महिने किंवा वर्ष असतात. आजूबाजूचा समाज कधीकधी त्याला खतपाणीही घालतो. आई-वडील आणि इतर वडीलधारे ह्या खड्ड्याला वळसा घालून प्रवास व्हावा म्हणून खूप प्रयत्नात असतात. आपले पाय जमिनीवर नाहीत आणि डोकं आभाळात अशा सुरेख गैरअवस्थेत आपण आत्मविश्वासाने चालत रहातो. तबला शिकण्याआधी अनेक वर्षं कथ्थक शिकले. ताल अंगात होताच, घरी वाद्यं होती. कसा कोण जाणे, पण तबला वाजवताच येत होता. नाच थांबला आणि मग रीतसर तबला शिकायला लागून तीनेक तरी वर्षं झाली होती.

लेखन प्रकार: 

मृद्गंध

"या

वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. धरणांचीही स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याचा संभव आहे. या परिस्थितीला तोंड देणे व त्यावरची उपाययोजना यासाठी आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक आयोजित केली आहे."

बोलून होताच सुळयांनी, मुख्य सचिवांनी बैठकीवर एक नजर फ़िरवली व एक दीर्घ श्वास घेतला. तातडीची बैठक बोलावण्यामागे कारणही तसंच होतं. जुलै उलटून गेला तरी राज्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. दुष्काळाचे चटके जाणवायला सुरुवात झाली होती.

"एकदंरीत काय स्थिती आहे?" मुख्यमंत्र्यानी शांततेचा भंग करत विचारलं.

लेखन प्रकार: