कथा

द माईंड स्पा

गॉड, उठवत नाहीये. तरीही जड हातांनी पांघरूण सारून ती उठते. शील चार दिवस तिच्या आजीआजोबांकडे आहे. ती नसली तरी आपलं आपलं करायचा इतका कंटाळा येतो. ती असताना कसं जमवते मी हे? कुठून आणते तेवढा स्टॅमिना? आज मस्त सुट्टी घ्यावी आणि आरामात दिवस काढावा असं तिच्या मनात आलं पण ही लक्झुरी आपल्यासाठी नाही. सुट्ट्या फ़ार मौल्यवान आहेत माझ्या. शीलसाठी, आईबाबांसाठी आणि स्वत:च्या अगदी हलणं शक्य नाही अशा चुकार आजारपणांसाठी.

लेखन प्रकार: 

देवी

टेप पहिली - दिवस पहिला

"बो

ल बाळा, काय इच्छा हाये तुजी?"
"आपली कृपादृष्टी राहू दे माते."
"ती हायेच. तुला काय पायजेल ते सांग."
"काहीच नाही माते. आपल्या कृपेने सगळं आहे."
"अन्सुये, याला अंगारा दे. प्रसाद दे."

लेखन प्रकार: 

परतफेड

"स्व

तःसाठी काय कोणीही जगतं. आपल्यासाठी कोणीही शिक्षण घेतं. आपल्या परिवारासाठी कोणीही संपत्ती गोळा करतं. त्यात काय एवढे मोठे? प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःची आणि आपल्या परिवाराची परिसीमा छेदून जाऊ शकता? 'आयुष्यात तुम्ही किती शिकलात किंवा किती संपत्ती गोळा केलीत' ह्यावर तुमचे मोठेपण अवलंबून नसते तर 'तुमच्या शिक्षणाचा आणि गोळा केलेल्या संपत्तीचा समाजाला काय उपयोग झाला' हेच खरं तुमच्या मोठेपणाचं मोजमाप!"

बाबा खरंच, तुम्ही त्या दिवशी हे शब्द बोललात काय, जणू माझ्या जीवनाचा agenda च तयार केलात !

लेखन प्रकार: 

टिल डेथ डू अस अपार्ट..

"हा

य! आज ऑनला‌ईन..? अभीची ना‌ईट शिफ्ट आहे वाटतं! ;-)"

आज जरा कुठे एफबी वर फोटो अपलोड करायला आले तर तेवढ्यातल्या तेवढ्यात स्मिने पिंग करत विचारलंच.

"अगं बाई फोटो अपलोड करायला आलेय इथे. लास्ट मंथच्या ट्रेकचे. बघा आणि ला‌ईक करा".

"गाणी पण ऐकतेय 'अभीज कलेक्शन'", मी रिप्लाय टाईप करून पुन्हा कामाला लागले.

तेवढयात तिचा रिप्लाय आला, "मी मिऽऽऽऽऽऽऽस करतेय :भ्याऽऽऽऽ: बाय द वे कुठे गेला होतात? आपला ग्रूप?"

"पेबला. माझ्या ऑफिसचा ग्रूप. सु होती आम्हा दोघांबरोबर "

"सु आपली सु? सुदिप्ता?" तिने चकित हो‌ऊन विचारलं.

लेखन प्रकार: 

एका सरकारी कारकुनाचा मृत्यू (अनुवाद)

किडामुंगीप्रमाणे जगणार्‍या, सतत कुठल्या ना कुठल्या खर्‍या वा काल्पनिक भीतीच्या दडपणाखाली वावरणार्‍या पापभीरू वर्गातलाच एक म्हणजे सरकारी कारकून चेरव्हॅकोव्ह. दस्तायेव्हस्कीच्या कादंबरीतील काही प्रमुख पात्रांप्रमाणेच ह्या कथेच्या नायकाच्या आडनावाचा अर्थही आशयाशी जोडलेला ('चेर्व्हाक' म्हणजे किडा). हे ध्यानात घेतलं, तर कथेचा काहीसा अतिरंजित वाटू शकेल असा रूपकात्मक शेवट अधिक अर्थपूर्ण वाटतो.

borderpng.png

लेखन प्रकार: 

झाड

शेवटी आप्पा उठले, आणि 'येतो तात्या' म्हणत काठी सावरत निघालेच. 'आप्पा, अहो निघालात कुठं?' असं तात्या म्हणतात तोवर आप्पा रस्त्यावर आलेच. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत तिथेच ते थोडा वेळ काठी हलकेच आपटत थांबले. पाण्याच्या टाकीच्या दिशेने, गावाबाहेर जाण्यासाठी दोन पावलं टाकून पुन्हा थबकले. मग वळून काहीतरी निश्चय केल्यागत उलटपावली चालू लागले.

borderpng.png

लेखन प्रकार: