काळ

HDA2014_kaal.jpg

का कुणाशीही जुळेना नाळ आता
सोबतीला फक्त उरला काळ आता


केवढा आ ऽऽऽ ... वासला आहे पुराने
पाहुनी काळास सुटली लाळ आता


काय नेत्याची नजर पडली अम्हावर
काळसुद्धा वाटतो लडिवाळ आता


घाव ज्याचे तोच मग होईल औषध
काळ अत्रे, काळ ठणठणपाळ आता


नाचते त्याच्याच तालावर उभे जग
काळ झाला ह्या युगाचे चाळ आता


हे अचानक प्रेम का दाटून आले?
बदलणे काळाप्रमाणे... टाळ आता


थांब ना.. डोळ्यात तिजला साठवू दे
एक क्षण दारामधे रेंगाळ आता

related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangoLee3.jpg

HDA2014_blackseparator.jpg

मिलिंद छत्रे

HDA_14_MilindChhatre.jpg

मिलिंद छत्रे हे व्यवसायाने संगणक अभियंता आहेत. १९९८पासून ते मायबोलीवर कार्यरत आहेत. १९९९पासून त्यांनी विविध संकेतस्थळांवर विडंबने, कविता लिहायला सुरुवात केली. २००७ -०८पासून ते सातत्याने गझललेखन करत आहेत. त्यांनी आजवर पुण्यातील विविध मुशायरे व काव्य मैफ़िलींमध्ये सादरीकरण केले आहे.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

लय भारी मिल्या!
लडीवाळवाली कोटी, सो टिपिकल मिल्या :) मस्त!

'लाळ' आणि 'टाळ' सर्वात छान वाटले.

हम्म्म्म्म