नाट्यगीत

कशी केलीस माझी दैना

कशी केलीस माझी दैना
रे मला तूझ्याबिगर करमेना
घडिभरी माझिया मना
चैन पडेना, नीज येईना, रे मला

तू राघू, तूझी मी मैना
माझं रुप बिलोरी आईना
अंगी ईष्काचा आजार, करी बेजार
कमती होईना, रे मला

तू हकिम होउन यावे
एकांती औषध द्यावे
दे चुंबन साखरपाक
मिठीचा लेप, मजसी साजणा, रे मला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नरवर कृष्णासमान

नरवर कृष्णासमान
घेतसे जन्मा
भाग्य उदेले
शिकवी सुकर्मा

बहुत नृपति ते
आले गेले
परि मनाला
यदुवर हा
झाला मंत्र महान

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दिवस आजचा असाच गेला

दिवस आजचा असाच गेला, उद्या तरी याल का
अन राया अशी जवळ मला घ्याल का ?

पैठणी जांभळी जरिकुंद नेसुनी
मी वाट पहाते केव्हाची बैसुनी
हि घडीमागुनी घडी जातसे सुनी
जागरणाने जळती डोळे
काजळ घालाल का ?

किती किती योजिले होते बोलायचे
मनगूज मनीचे होते खोलायचे
संगतीत तूमच्या होते उमलायचे
कळ्या आजच्या शिळ्या उद्याला
ओठाशी न्याल का ?

या सरत्या राती तळमळते मी अति
लोळते पलंगी, पुन्हा बदलते कुशी
मज रुते बिछाना, नको नको हि उशी
हवा वाटतो हात उशाला
आल्यावर द्याल का ?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

माझे जीवन गाणे

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे

व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे

कधी ऐकतो गीत झर्‍यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
कधि वाऱ्यातुन, कधि तार्‍यातुन झुळझुळतात तराणे

तो लीलाघन सत्य चिरंतन
फुलापरी उमले गीतातुन
स्वरास्वरातुन आनंदाचे नित्य नवे नजराणे

गा विहगांनो माझ्यासंगे
सुरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन उसळे प्रेम दिवाणे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जोहार मायबाप जोहार

जोहार मायबाप जोहार
तुमच्या महाराचा मी महार

बहु भुकेला झालो
तुमच्या उष्ट्यासाठी आलो

बहु केली आस
तुमच्या दासाचा मी दास

चोखा म्हणे पाटी
आणिली तुमच्या उष्ट्यासाठी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: