नाट्यगीत

ती पाहताच बाला

ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला
छातीत इष्क भाला, की आरपार गेला ॥ धॄ ॥

स्वर्गातल्या पर्‍य़ाना, कि वस्त्रगाळ करुनी
कमनीय देह विधिने, रचिला तिचा छबेला ॥ १ ॥

लावण्य काय सारे, उकळोनी वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा, भरला गमेचि बुधला ॥ २ ॥

डौलात चालता ती, हत्ती वनात झुरती
रस्त्यात गुंड जमती, तिज अन पहावयाला ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तू जपून टाक पाऊल जरा

तू जपून टाक पाऊल जरा, जीवनातल्या मुशाफिरा ॥ ध्रु ॥

हवे तुला ते नच तुजपाशी, मिळे न ते का व्यर्थ धुंडिशी
गांठ अखेरिस यमाबरोबर, भुलू नको हा मंत्र जरा ॥ १ ॥

पापपुण्य जे करशिल जगती, चित्रगुप्त मागेल पावती
पापाइतुके माप ओतुनी, जे केले ते तसे भरा ॥ २ ॥

जीवन सुखदु:खाची जाळी, त्यात लटकले मानव कोळी
एकाने दुसर्‍यास गिळावे, हाच जगाचा न्याय खरा ॥ ३ ॥

अथांग सागर अवती भवती, सौख्य शोक दों तीरावरती
तुला हवे ते जया दिशेने, उचल टाक पाऊल जरा ॥ ४ ॥

चौर्‍यांचीच्या पडल्या गाठी, बालक होतिल जरठ शेवटी
तारुण्याच्या उन्मादाने, विसरतोस का तुझी जरा ॥ ५ ॥

हवास तोवर तुला जवळतिल, गरज संपता दूर लोटतिल
ओळखून ही रीत जगाची, रहा जवळ लांबून जरा ॥ ६ ॥

दानव जगती मानव झाला, देवाचाही दगड बनवला
कॊण कोठला तू तर पामर, चुकुन तुझा करतील चुरा ॥ ७ ॥

निरोप जेव्हा येइल वरचा, तेव्हा होशिल सर्वाघरचा
तोवर तू या रिपू जगाचा, चुकवुनि मुख दे तोंड जरा ॥ ८ ॥

मृगजळॆ सगळे तुझिया पुढती, तहानला तू तयामागुती
पाण्यातच तू पाण्यावाचुन, व्याकुळ रे होशिल पुरा ॥ ९ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कां धरिला परदेस

कां धरिला परदेस, सजणा
कां धरिला परदेस ॥ ध्रु ॥

श्रावण वैरी बरसे झिरमिर
चैन पडेना जीवा क्षणभर
जाऊं कोठे राहू कैसी, घेऊ जोगिणवेष ॥ १ ॥

रंग न उरला गाली ओठी
झरती आसू काजळकाठी
शॄंगाराचा साज उतरला, मुक्त विखुरले केश ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

शतजन्म शोधिताना

शतजन्म शोधिताना, शत अर्ति व्यर्थ झाल्या
शत सूर्यमालिकांच्या, दीपावली विझाल्या ॥ १ ॥

तेव्हां पडे प्रियासी, क्षण एक आज गाठी
सुखसाधना युगांची, सिद्धिस अंति गाठी ॥ २ ॥

हा हाय जो न जाई, मिठी घालु मी उठोनी
क्षण तो क्षणात गेला, सखि हातचा सुटोनी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

वद जाउं कुणाला शरण

वद जाउं कुणाला शरण.
करिल जो हरण संकटाचे
मी धरिन चरण त्याचे ॥ ध्रु ॥

बहु आप्त बंधु बांधवा,
प्राथिले कथुनि दु:ख मनिंचे
ते होय विफल साचे ॥ १ ॥

मम तात जननि मात्र ती
बघुनि कष्टती हाल ईचे
न चलेचि काहि त्यांचे ॥ २ ॥

जे कर जोडुनि मजपुढे
नाचले थवे यादवांचे
प्रतिकूल होति साचे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देह देवाचे मंदिर

देह देवाचे मंदिर
आत आत्मा परमेश्वर

जशी ऊसात हो, साखर
तसा देहात हो, ईश्वर
जसे दुधामध्ये लोणी
तसा देही चक्रपाणी

देव देहात देहात
का हो जाता देवळात
तुका सांगे मूढ जना
देहि देव का पाहिना

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अंग अंग तव अनंग खुलवि मदन-मंजिरी

अंग अंग तव अनंग खुलवि मदन-मंजिरी
देवदूत याचितात सुखद-संग माधुरी

मंद मंद हसित-लसित
वदन प्रणयरंग सदन
रूपरंग बहर तुझा कहर करी अंतरी

तव यौवन रंगदार
चाल तुझी डौलदार
जादुभरे नैनबाण हरिति प्राण सुंदरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तू तर चाफेकळी

"गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी" ॥ ध्रु ॥

ती वनमाला म्हणे, " नृपाळा हे तर माझे घर
पाहत बसले मी तर येथे, जललहरी सुंदर ॥ १ ॥

हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा ॥ २ ॥

घेउनि हाती गोड तिला त्या कुरणावरती फिरे
भाऊ माझा, मंजुळवाणे गाणे कधी ना विरे "॥ ३ ॥

"रात्रीचे वनदेव पाहुनी, भूलतिल रमणी तुला
तू वनराणी, दिसे न भुवनी तुझिया रुपा तुला ॥ ४ ॥

तव अधरावर मंजुळ गाणी, ठसली कसली तरी
तवनयनी या, प्रेमदेवता धार विखारी भरी ॥ ५ ॥

क्रिडांगण जणु चंचल सुंदर भाल तुझे हे गडे
भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळा उडे ॥ ६ ॥

अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी
भूलले तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी ॥ ७ ॥

सांज सकाळी हिमवंतीचे सुंदर मोती घडे
हात लाविता परि नरनाथा ते तर खाली पडे ॥ ८ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कठीण कठीण

कठीण कठीण कठीण किती
पुरुष हृदय बाई
स्त्री जातिप्रति झटता
अंत कळत नाही

हृदयाचा सुंदरसा
गोफ गुंफिती
पदर पदर परी शेवटी
सुटत सुट्त जाई

रंगुनी रंगात मधुर
मधुर बोलति
हसत हसत फसवुनि
ह्रिदबंध तोडिती

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

छंद तुझा मजला

छंद तुझा मजला, का मुकुंदा लावियला
अशी कशी रे मी, भुलले सांग तुला ॥ ध्रु ॥

संसारी माझ्या, येउनिया ऐसा
केला घात पुरा पुरा, का रे असा घननिळा ॥ १ ॥

कशास झाले सासुरवाशिण मी रे
उठता बसता तुझेंच चिंतन
कुणा म्हणू रे मम स्वामी, न कळे मी
जोवरी तू मनी माझ्या ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: