ललित

हिंसा आणि 'वॉर अँड पीस'

आपण कितीही नाकारायचं म्हटलं, तरी हिंसेचं इंद्रिय हे माणसात कुठेतरी रूजलेलं असतंच. उत्क्रांत होताना एक अपरिहार्य गरज म्हणून कदाचित हिंसेचं मूळ आपल्या स्वभावात रोवलं गेलं असेल. हे एकदा जाणवल्यावर सार्‍या संस्कृतींनी ह्यावर तोडगा काढण्याचा (पूर्णतः यशस्वी न ठरलेला) प्रयत्न केलेला दिसतो. 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'सारखी लहान मुलांतही आढळणार्‍या हिंसेच्या प्रवृत्तीचं चित्रण करणारी कादंबरी असो वा तेंडुलकरांचं मध्यमवर्गीय माणसांतल्या हिंसेचा अस्वस्थ करणारा उघडानागडा चेहरा आपल्यासमोर ठेवणारं 'शांतता!

लेखन प्रकार: 

सुसूत्र

"माईक टेस्टिंग झालं ना सगळ्यांचं? चला तर मग सुरू करा. आधीच उशीर झालाय." ही सूचना ऐकली आणि मला पुढे सरसावावंच लागलं.
"अहो, अहो, मी उरलेय. मला माईकच काय, पण बसायला जागाही नाही हो मिळाली."चेहर्‍यावरचा केविलवाणा भाव माझ्या सुरातून व्यक्त झालाय याची मला खात्री असते.

लेखन प्रकार: 

भेळ! भेळ!! भेळ!!!

'भेळ' नक्की कधी आवडायला लागली ते आठवत नाही पण इतकं मात्र आठवतंय की लहान म्हणजे कधीतरी खूपच लहानपणापासून भेळ हा सगळ्यात आवडता पदार्थ झालाय! काही आवडी-निवडी रक्तातच असतात असं म्हणतात. एखाद्या दिवशी रात्री "जेवणाऐवजी भेळ चालेल" असं आई म्हणते तेव्हा माझ्यात भेळेची आवड कुठून आलीय त्याची मला खात्री पटत राहते!

लेखन प्रकार: 

छायाचित्रण अवघड नाही!

सध्या छायाचित्रण झाडून सगळे लोक करतात. अगदी वय, शिक्षण, आर्थिक स्थिती, कशाचेही बंधन नाही. पूर्वी जेव्हा फिल्मवाले कॅमेरे असायचे, तेव्हा तरी याला काही बंधनं होती, पण डिजिटल क्रांतीनंतर प्रत्येकाकडे डिजिटल कॅमेरा आला. त्याचे फायदे नाकारता येण्यासारखे नाहीत. जसं:

  • फुकटात फोटो (फिल्म कॅमेर्‍यात फोटोमागे ५ रु. जायचे).
  • फोटो काढल्या काढल्या पाहायची सोय (फिल्म संपल्यावर डेव्हलप करायची भानगड नाही).

सामान्यांच्या दृष्टीने हे 'लाख'मोलाचे फायदे आहेत. पण यामुळे काही वाईट सवयी लागतात:

  • वाट्टेल तितके फोटो काढणे.
लेखन प्रकार: 

रस्किन बाँड : माउंटन्स इन माय ब्लड..

देहराडूनच्या सुप्रसिद्ध 'ग्रीन बुकशॉप'ने खास आयोजित केलेल्या रस्किन बाँडच्या सर्व साहित्याच्या प्रदर्शनाचे आणि त्याच्या 'नोट्स फ्रॉम अ स्मॉल रूम' या नव्या पुस्तकाच्या अनौपचारिक प्रकाशनाचे आमंत्रण रस्किनच्या आवडत्या जिरॅनियमच्या सुकवलेल्या फुलांना चिकटवून तयार केलेल्या एका सुंदरशा बुकमार्कसहित पोस्टाने माझ्याकडे आले. सोबतच्या माहितीपत्रकात पुस्तकातले त्याचे काही लेख छापले होते. एका लेखाचं नाव होतं 'थॉट्स ऑन रिचिंग सेव्हंटी फाईव्''. प्रदर्शनाचे निमित्तच होते रस्किनचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करण्याचे.

रस्किन ७५ वर्षांचा झाला?

लेखन प्रकार: 

बाप माणूस.......!

माझ्या ३१ व्या वाढदिवसाला मला (नव्हे, आम्हां सहा भावंडांत प्रथमच एखाद्याला) आयुष्यात पहिल्यांदा 'हॅपी बर्थ डे' म्हणणारे माझे वडील त्यांच्या कामाच्या क्षेत्रात एकदम बाप माणूस आहेत. नुकताच त्यांचा ७१ वा वाढदिवस झाला. झाला अशासाठी, की आम्ही तो जोरदार साजरा करायचे ठरवले होते, पण 'असली थेरं करणार असाल, तर मी त्या दिवशी बाहेरगावी जाईन' अशी तंबी मिळाल्याने शेवटी तो बेत रद्द केला. त्यांना घेऊन जवळच्याच श्री क्षेत्र देवगड (तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर) येथे दर्शनाला घेऊन गेलो आणि बळेच त्यांना जेवणाची ट्रीट दिली!

लेखन प्रकार: 

संप आणि जगूचे किश्शे...

ही गोष्ट आसा १९७७-७८ ची. साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात राज्य सरकारचे बहुतेक सगळे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले. सरकारी कर्मचार्‍यांबरोबर प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक सगळ्या शाळातले, कॉलेजातले मास्तर आणि प्रोफेसर सुद्धा संपावर गेले. हो संप बरेच दिवस, म्हणजे सत्तावन्न दिवस, सुरू होतो. आता सगळे मास्तर, प्रोफेसर संपावर गेले म्हटल्यार शाळेतल्या पोरांची मजाच झाली. "आधीच उल्लास, आणि तेतूर परत फाल्गुन मास" - अशीच अवस्था झाली.

लेखन प्रकार: 

किल्ला!

टी.व्ही. नामक सैतानानं जगणं व्यापून टाकलं नव्हतं तेव्हाचे हे दिवस.

वर्षाचा कार्यक्रम चोख ठरलेला असायचा. समांतर अशा दोन प्रक्रिया. समांतर म्हणजे मानसिक स्तरावर. एक प्रक्रिया इंग्रजी कॅलेंडरनुसार. दुसरी मराठी किंवा ज्याला साधारणपणे हिंदू म्हणतात, त्या कालगणनेनुसार.

जून महिन्यात शाळा सुरू व्हायच्या. पावसालाही त्याचवेळी सुरुवात व्हायची. साधारण दोनेक महिन्यांनी पहिली परीक्षा व्हायची. तिमाही. आणखी दोनेक महिन्यांनी दुसरी परीक्षा व्हायची. सहामाही. हा साधारण साडेचार महिन्यांचा कालावधी असायचा. इथं पहिल्या टप्प्याचं इंग्रजी कॅलेंडर संपतं.

लेखन प्रकार: 

आस्वाद : मनोहर सप्रे यांचे पत्रसंग्रह

मनोहर सप्रे एक व्यंगचित्रकार म्हणून जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढे लेखक म्हणून नाहीत, हे एक अनाकलनीय वास्तव म्हटलं पाहिजे. खरं तर त्यांनी नागपूरच्या 'तरुण भारत' मध्ये [मनमौजी या टोपणनावानं] आणि इतर नियतकालिकांत, दिवाळी अंकांतून अनेक स्फुटं, लेख लिहिले आहेत. व्यंगचित्रकलेवरच्या त्यांच्या लेखांचे 'आलस-कलस' [नील प्रकाशन, चंद्रपूर], 'फरसाण' [नील प्रकाशन, चंद्रपूर] आणि 'हसा की!' [राजहंस प्रकाशन, पुणे] असे तीन संग्रह प्रकाशित झाले आहेत. आजमितीला ती पुस्तकं 'आऊट ऑफ प्रिंट' असली, तरी त्यांच्या नवीन आवृत्त्या काढाव्यात असा सप्र्यांच्या चाहत्या वाचकांचा आग्रह आहे. ते घडून आलं, तर छानच होईल.

लेखन प्रकार: 

दौलू

सेना न्हावी या संतानंतर आमचा दौलू न्हावीच ! सेना न्हाव्याच्या काळात दौलू नव्हता म्हणून, नाही तर त्याने तेव्हाच जाहीर करून टाकलं असतं, 'दौलू हाच माझा आध्यात्मिक वारस आहे!' माझी खात्री आहे दौलूची संत-महात्म्यांवरची, धर्मावरची प्रवचनं तुम्ही ऐकली असती, तर तुम्हालादेखील माझं म्हणणं पटलं असतं.

या दौलूचा जन्म कुठं, कधी आणि कशासाठी झाला हे विचारायला माझ्या तोंडाला 'उघडीक’ कधी मिळू शकलीच नाही. वास्तविक मला हे विचारायचं कारणही नव्हतं ही गोष्ट खरी आहे. तरीही आता त्याच्यावर चार ओळी लिहायला घेतल्या आहेतच तर म्हणून वाटतं, की विचारलं असतं तर बरं झालं असतं; एव्हढंच !

लेखन प्रकार: