ललित

मार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग

'मॅ

जिकल रिअ‍ॅलिझम' किंवा जादुई वास्तववाद म्हणजे थोडक्यात कथानकात तर्क्य आणि अतर्क्य गोष्टींची बेमालूम सांगड घालणे, असं म्हणता येईल. अतर्क्य गोष्टी म्हणजे निव्वळ कल्पनेच्या अमर्यादित भरार्‍या नव्हेत, तर 'प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट' ह्या कल्पित विरोधाभासाचा वास्तवात रुतलेला पाया. दोन अगदी विरुद्ध टोकाच्या गोष्टी कथानकाच्या ओघात एकत्र आणून त्यांच्या विरोधाभासातून कथानक पुढे नेणं, हा या शैलीचा मुख्य उद्देश म्हणता येईल.

लेखन प्रकार: 

या छंदावर जपुनी प्रेम करावे...

छं

द म्हटलं की आपल्या डोक्यात सर्वात आधी काय येतं? छंद म्हणजे स्वानंदासाठी, मनोरंजनासाठी जी गोष्ट आपण आवडीने करतो, तो आपला छंद. व्यक्ती तितक्या प्रकृतीच नव्हे, तर व्यक्ती तितके छंद असंही म्हणता येईल. आज माझ्या छंदाची मी तुम्हाला ओळख करुन द्यायचं म्हणतोय. माझ्या छंदाची गंमत म्हणजे, त्यावर मी वेळ घालवला की नुसताच वेळ जात नाही, तर मी बरोबर घेऊन जातो त्यातली एक महत्त्वाची गोष्ट संपून जाते आणि दाखवायला उरतं काय? तर भोकं पडलेले कागद!

लेखन प्रकार: 

हो, मी बोलतोय!

"मु

लीचे मामा, मुलीला घेऊन या"
गुरुजींनी माईकवर ही घोषणा केली आणि अंगावरच्या रेशमी शालूला जबाबदारीचे काठ लागल्याची जाणीव झाली!

मामा खोलीच्या दाराशी आलेच, "दिदी, तयार आहेस बेटा?" आवाजातला गहिवर खूप काही सांगून गेला!

क्षणभर होकारार्थी मान हलली आणि पावलं दाराकडे वळली, दाराशी अडखळले जराशी, मागे वळून पाहिलं, नकळत माझ्याही...... माझं आडनाव आणि बालपण तिथेच राहिलं होतं!

खोलीपासून बोहल्यापर्यंत जाताना, मामांनी क्षणभर डोक्यावर हात ठेवला, आमची नजरानजर झाली, डोळ्यांतच पराकोटीचा आधार दिसला...

लेखन प्रकार: 

खेळ नुसता…. टक टक्काक टक!

"अ

रे टोण्या, जागचा हाल ना... मूव्ह लेका मूव्ह.. एका जागी उभा काय राहतोस?"

टक टक..टक टक....टक टक्काक टक… हा आवाज ध्यानीमनी असायचा….कित्येक वर्षं! खेळतानाही मनातल्या मनात स्वत:शीच बोलणं चाललेलं असायचं. कधी कधी मात्र मनातले बोल तोंडातून उमटायचे, "अरे टोण्या, जागचा हाल ना..". जेमतेम ९ X ५ फूट टेबल ते, पण आजूबाजूचं भान सुटून सगळं जग जणू त्या टेबलावर असायचं!

लेखन प्रकार: