इतर

(वरीलपैकी कुठल्याही प्रकारात न बसणारं साहित्य)

शब्दकोडे (गजानन)

शब्दकोडे
01_HDA2012_shabdakode_GD.jpg

आडवे शब्द :
१. डोक्यात उलट-सुलट विचारांचा गोंधळ होऊन होणारी मनाची अवस्था
४. बहुमत
६. रूप बदलून सीतेच्या मनाला भुरळ घालणारा दैत्य
८. मनवळवणी, तरफदारी, मध्यस्थी
१०. धूर्त, चलाख
११. नखरेल बाई
१३. जिव्हारी झालेली जखम, रहस्याचा स्फोट
१५. जंगल, अरण्य
१७. संरक्षणार्थ धारण केलेले साधन
१८. एक चर्मवाद्य
२०. हद्दपारीची शिक्षा भोगण्याचे ठिकाण
२१. गाण्याची मैफल
२२. एक वृक्ष
२४. रोजच्या आहारातले एक तृणधान्य

लेखन प्रकार: 

आलेल्या लेखांसंदर्भाने..

परिसंवादासाठी 'लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख' हा तसा क्लिष्ट विषय जाहीर करताना कशाप्रकारचा प्रतिसाद मिळेल, याबद्दल आम्ही थोडे साशंक होतो. नेहमीच्या विषयांसारखा लिखाणाचा पाऊस पडणार नाही ह्याची कल्पना होतीच.

विषय जाहीर झाल्यावर अर्थातच अनेकांना अनेक प्रश्न पडले. काही प्रश्नांना समाधानकारक उत्तरे आम्ही देऊ शकलो तर काहींना नाही. पडलेले प्रश्न, असलेले आक्षेप घेऊन मनोगत लिहून पाठवण्याविषयी आम्ही विनंती केली होती, कारण त्या प्रश्नांतूनच या विषयाचा वेध घेणे शक्य होणार होते. एखाददुसरा अपवाद वगळता फारसे कुणी असे लेख पाठवले नाहीत.

लेखन प्रकार: 

संपादकीय

नमस्कार मंडळी,

'संयुक्ता'तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने विशेष उपक्रम करण्याचे हे तिसरे वर्ष. महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांशी संबंधित विषय आणि उपक्रम असणे हे तसे यथायोग्यच. त्याप्रमाणे दोन वर्ष स्त्रियांना वा स्त्रीवादाला केंद्रस्थानी ठेवून उपक्रम केले गेले.

व्यक्ती जन्माला येताना स्त्री वा पुरुष म्हणून जन्माला येते. ते त्या त्या व्यक्तीचं जीवशास्त्रीय सत्य. परंतु जन्मापासून शेवटापर्यंत प्रत्येक वेळी, प्रत्येक घटनेत त्या व्यक्तीच्या असण्यात स्त्री वा पुरूष असणं एवढंच असतं का? तर नाही. तसं तर नसतं. स्त्री वा पुरूष असण्याआधी मनुष्यप्राणी असणं हे एक जीवशास्त्रीय सत्य असतंच.

लेखन प्रकार: 

पणती जपून ठेवा