इतर

(वरीलपैकी कुठल्याही प्रकारात न बसणारं साहित्य)

ललित


नातल्या भावना, हृदयातली स्पंदनं, डोक्यातले विचार अवतरतात कधी हळव्या, अल्लड नक्षीसारखे वळणदार तर कधी तर बाणांसारखे सरळ, टोकदार... कधी चढते त्यांना धार वैखरीची तर कधी डोकावतात ते उपहासाच्या रुपात... ललित म्हणून !!

लेखन प्रकार: 

हितगुज दिवाळी अंक २०१२ : तंत्रमैत्र - परिसंवाद

१.

२६ वर्षाच्या अस्मा माहफ़ूझने यूट्यूबवरती केलेल्या एका आवाहनाला सोशल मिडीया, मोबाईल यांच्यामार्फ़त लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे ताहरीर चौक कैरोमध्ये जमा झालेले हजारो लोक. त्यानंतर इजिप्तच्या होस्नी मुबारक यांची राजकीय सत्ता उलथावून टाकली गेली.

२. एका मार्क डग्गन नावाच्या सशस्त्र इसमाला पोलिसांनी गोळ्या घातल्या. त्यावरून लंडनच्या एका छोट्या भागात सुरू झालेले लुटालूटीचे, जाळपोळीचे लोण, लंडनजवळच्या इतर शहरात पसरले. ब्लॅकबेरी आणि ट्विटर आणि फेसबूकचा वापर करून ही लुटालूट, जाळपोळ, तोडफोड यांचे सत्र निश्चित केले जात होते असे निदर्शनास आले आहे.

लेखन प्रकार: 

छंदमग्न


छं

द म्हणजे रोजच्या जगण्यातल्या विसाव्याच्या जागा! आपल्याला घडवणारं, खुलवणारं, सर्जनाची तृषा जागवणारं आणि शमवणारं असं हे वेड... आणि अशा ह्या आगळ्या वेगळ्या छंदांच्या प्रवासात तल्लीन झालेले काही 'छंदमग्न' !

लेखन प्रकार: 

संपादकीय



saraswati.png

श्री

गणरायाच्या शुभाशीर्वादाने कार्याला आरंभ करून, आज दिवाळीच्या मंगलमय, चैतन्यमय वातावरणात 'हितगुज २०१२चा दिवाळी अंक' आपणांसारख्या रसिक वाचकांसमोर सादर करताना संपादक मंडळाला अतिशय आनंद होत आहे.

लेखन प्रकार: 

ओल्या मातीच्या कुशीत

पा

वसाच्या सरी येऊन जमिनीला भिडल्या, की बालपणीच्या अनेक जुन्या आठवणी सरींसारख्या बरसू लागतात. पाऊस आणि माझं एक जिव्हाळ्याचं नातं आहे.

मी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. माझे आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. शेतकरी आणि पावसाचं एक जिवाभावाचं नातं असतं. मे महिना आला की शेतकरी वाट पाहू लागतात ते काळ्या ढगांची, गार गार वार्‍याची, मातीला सुगंध देणार्‍या, बी-बियाणांचे मातृत्व स्वीकारणार्‍या पहिल्या सरीची.

लेखन प्रकार: 

मी आणि ती

रं तर तिचा मला नाद कधी लागला हे सांगता येणार नाही, पण मी तिला पहिल्यांदा कधी हाताळले हे लख्खपणे आजही डोळ्यासमोर दिसतं. काही काही गोष्टी मनात आत, पार खोलवर रुतून बसतात आणि त्या नेहमी आपल्याला आठवतात तशीच काहीशी तिची माझी पहिली भेट! मी बहुदा साडेचार किंवा पाच वर्षांचा असेन तेव्हा. वडिलांनी त्या दिवशी एक रुपया देऊन सांगितले, "भाड्याने आण !"

लेखन प्रकार: