ऋतू अंतरीचे...
वेळ थांबली दारात
उसाश्याच्या काठावर
नीज वेशीपाशी झुले
रातराणी अंगणात
तारकांचा तो झुंबर
मनी घालतसे पिंगा
साठवांच्या त्या घागरी
अन ऊरी असे दंगा
दुः ख आटवूनी घ्या रे
करा सुखाचि पखरण
रात मावळत येता
उजाडेल नवा दिस..
- ऋतुवेद
लेखन प्रकार: