...मग मीच दिला
तो रुतणारा सल काढून तुझ्या हातात......
"हम्म,
बराच मोठा होता गं!
आणि खूप जुना दिसतोय...
कित्येक वर्षांपासून वागवत आलीस सोबत?
पिवळा झालाय पार....
नासूर झाली असती जखम...!"
खिशातून लाईटर काढून शिलगावलास त्याला...
राख होईपर्यंत, वाट पाहिलीस!
"तुलाच काढता आला,
इतके दिवस का राखलास आत?"
त्याला जाळणारे हात हवे होते रे..!!
आता जखमही भरेल अलवार....
- बागेश्री