दाटलेल्या काळोखाचे कोडे कडे कपारीत
कोंडलेल्या श्वासांभोती काही घडे विपरीत
इच्छा अनिच्छांची मिठी, वैराग्य नागडे उघडे
कल्लोळात विस्मयाच्या विरक्त एकांत सापडे
अकल्पिताच्या लाटांवर इमला बांधला थोरला
सराईत मुलाम्याने रथ आंधळा हाकला
दिव्यांची सरता माळ, अंधार भासतो प्रेमळ
अर्घ्य सोडता श्वासांचे, जीवन सोयरे सकळ!
- हेमांगी