भावगीत

पंढरीनाथा, झडकरि आता

पंढरीनाथा, झडकरि आता, पंढरी सोडून चला
विनविते रखुमाई विठ्ठला

ज्ञानदेवें रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला?

धरणें धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा
भाविक भोंदू पूजक म्हणती, केवळ अमुचा देव उरला
कलंक अपुल्या महानतेला, बघवे ना हो रखुमाईला
यायचें तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मैत्रिणिंनो, सांगू नका नांव घ्यायला

मैत्रिणिंनो सांगू नका नांव घ्यायला

नका विचारूं स्वारी कशी?
दिसे कशी, अन् हांसे कशी?
कसं पाडलं मला फशी?
कशी जाहले राजिखुशी?
नजीक येतां मुहूर्तवेळा

नका विचारूं गमतीजमती
काय बोललो पहिल्या भेटी?
कसे रंगले स्वप्न पहाटी?
कशी रंगली लाली ओठी?
कसा जाहला जीव खुळा?

अर्थ उलगडे समरसतेचा
सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा
धुंद बने बुल्बूल जीवाचा
घरी यायची झाली वेळां

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तू दूर दूर तेथे

तू दूर दूर तेथे, हुरहूर मात्र तेथे
विरहांत रात्र मोठी, प्रेमी जनांस वाटे

शब्दांत सांगू कैसे, ते दु:ख अंतरीचे
ओलावले दवांत, हे कांठ पापण्यांचे
भरला स्वरात कंप, कंपात भाव दाटे

मी भाबडी मनाची, आहेच स्वप्नवेडी
विरुनी तुझ्यांत जावे, ही आस एक वेडी
राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते

भाळावरी असे हे, सौभाग्य लाल कुंकू
विक्राळ काळ येता, दोघे तयास जिंकू
फुलता मनात आशा, ओठांत गीत येते

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जेव्हा तुझ्या बटांना

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटाहि पक्षी
ओढून जीव घेते पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छ्ळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्याची ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा ?

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा ?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हृदयी जागा तू अनुरागा

हृदयी जागा, तू अनुरागा
प्रीतीला या देशील का?

बांधिन येथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे
शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का?

दोन मनांची उघडी दारे, आत खेळते वसंत वारे
दीप लोचनी सदैव तू रे, संध्यातारक होशील का?

घराभोवती निर्झर नाचे, जाणुन अपुल्या गूढ मनाचे
झाकून डोळे एकांताचे, जवळी मजला घेशील का?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सप्तपदी मी रोज चालते

सप्तपदी मी रोज चालते
तुझ्यासवे ते, शतजन्मीचे हो, माझे नाते

हळव्या तुझिया करांत देता
करांगुली ही रूप गोजिरी
गोड शिरशिरी उरात फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळांच्या देठांभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी, जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळुनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मुली तू आलीस अपुल्या घरी

लिंबलोण उतरता अशी का, झालीस गं बावरी?
मुली, तू आलीस अपुल्या घरी

हळदीचे तव पाऊल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
सोन्याहुन गं झाली पिवळी
मांडवाला कवळुन चढली, चैत्रवेल ही वरी

भयशंकित का अजुनी डोळे?
नको लाजवू सारे कळले
लेकीची मी आहे आई
सासुरवाशिण होऊन मीही, आले याच घरी

याच घरावरी छाया धरुनी
लोभ दाविती माय पक्षिणी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
सुखव मलाही आई म्हणुनी, बिलगुनी माझ्या उरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हसले गं बाई हसले

हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले

नयनकवडसा टाकुन कुणीतरी, दिपवी माझे लबाड डोळे
प्रीत मधाचे सुंदर पोळे, हृदयी शिरुनी चोरुन नेले

सांगायाची चोरी झाली, आई विचारी काय जहाले
चिडले, रुसले, माझ्यावर मी, मलाच होते हरवुन बसले

पाळत ठेवुन त्या लुच्च्याला, धरुनी बांधुनी खेचित नेले
वाजत गाजत कैदी केले, शासन करिता घरास मुकले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हे श्यामसुंदर राजसा

हे श्यामसुंदर राजसा, मनमोहना
विनवुनी सांगते तुज
जाउ दे मला परतुनी

गाव गोकुळ दूर राहे
दूर यमुनानीर वाहे
हरवले मी कसे मज
पोचले कुठे घनवनी?

पावरीचा सूर भिडला
मजसि माझा विसर पडला
नकळता पाउले मम
राहिली इथे थबकुनी

पानजाळी सळसळे का?
भिवविती रे लाख शंका
थरथरे, बावरे मन
संगती सखी नच कुणी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हा रुसवा सोड सखे

हा रुसवा सोड सखे,
पुरे हा बहाणा, सोड ना अबोला
झुरतो तुझ्याविणा, घडला काय गुन्हा
बनलो निशाणा, सोड ना अबोला ॥ ध्रु ॥

इष्काची दौलत उधळी, तुझा हा नखरा
मुखचंद्राभवती कितीक फिरती नजरा
फ़सवा राग तुझा, अलबेला नशीला
करी मदहोश मला
नुरले भान अता, जाहला जीव खुळा ॥ १ ॥

तूझे फ़ितूर डोळॆ गाती भलत्या गझला
मदनाने केले मुष्किल जगणॆ मजला
पाहुनी मस्त अदा, फुले अंगार असा
सावरुं तोल कसा
नको छळवाद अतां, झालो कुर्बान तुला ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: