चित्रपटगीत

का रे दुरावा

का रे दुरावा,का रे अबोला
अपराध माझा, असा काय झाला

नीज येत नाही, मला एकटीला
कुणी ना विचारी,धरी हनुवटीला
मान वळविसी तु वेगळ्या दिशेला

तुझ्या वाचुन ही, रात जात नाही
जवळी जर ये, हळू बोल काही
हाथ चान्दन्यान्चा, घेई ऊशाला

रात जागवावी नाही, असे आज वाटे
त्रुप्त झोप यावी, पहाटे पहाटे
नको जागने हे, नको स्वप्नमाला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मागतें मन एक कांही

मागतें मन एक कांही, दैव दुसरे घडविते
उमलण्याआधीच कैसे, फुल पायी तुडविते ॥ ध्रु ॥

खेळ नियती खेळते की, पाप येते हे फळां
वाहणार्‍या या जळाला, कोण मार्गी अडविते ? ॥ १ ॥

ईश्वरेच्छा हीच किंवा, संचिताचा शाप हा
चंद्ररेखा प्रतिपदेची, कोण तिमिरीं बुडविते ? ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कोकिळ कुहुकुहु बोले

कोकिळ कुहुकुहु बोले, तू माझा तुझि मी झाले ॥ धृ ॥

ऋतुराजा तुझि वासंती, तरुतळी इथे एकांती
कर कोमल देता हाती, चांदण्यात दिवसा न्हाले ॥ १ ॥

हिंदोळत डहाळीवरती, मोहरुन अपुली प्रीती
निर्झरांत टिपण्या मोती, पाखरु जिवाचे आले ॥ २ ॥

तू येता सखया जवळी, फुलवेल तरूला कवळी
मधुमरंद भरतो कमळी, पापणीत हसतां डोळे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जीवनांत ही घडि अशीच राहु दे

जीवनांत ही घडि अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे ॥ ध्रु ॥

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नांतिल चांदवा जिवास लाभु दे ॥ १ ॥

हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
स्पर्शातुन अंगअंग धुंद होउं दे ॥ २ ॥

पाहुं दे असेच तुला नित्य हांसतां
जाउं दे असाच काळ शब्द झेलता
मीलनांत प्रेमगीत धन्य होउं दे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

शुभंकरोती म्हणा

दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करु तिची प्रार्थना
शुभंकरोती म्हणा मुलानो, शुभंकरोती म्हणा ॥ ध्रु ॥

जेथे ज्योति, तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या, दिसती पाउलखुणा ॥ १ ॥

या ज्योतिने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना ॥ २ ॥

दिव्या दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार
दिव्यास पाहुन नमस्कार हा, रिवाज आहे जुना ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

झुलतो बाई, रास झुला

झुलतो बाई, रास झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा

वार्‍याची वेणू, फांद्यांच्या टिपर्‍या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी, चंदेरी टिळा

प्राणहीन भासे, रासाचा रंग
रंगहीन सारे, नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरी सावळा

गुंतलास कोठे, नंद नंदना तू
राधेच्या रमणा, केव्हा येशील तू
घट झरे, रात सरे, ऋतू चालला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मागे उभा मंगेश

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे

जटाजूट माथ्यावरी,
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे

जन्मजन्मांचा हा योगी,
संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसुतासंगे गंगा, मस्तकी वाहे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

निळ्या आभाळी कातरवेळी

निळ्या अभाळी, कातरवेळी, चांदचांदणे हसती
मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती

टिपूर चांदणे धरती हसते
पती पाहता मी भान विसरते
नदी समींदर नकळत मिसळूनी, एकरूप होती

मन मंदिरी मी पूजीन त्यांना
वाहीन पायी प्रीत फुलांना
पाच जीवांच्या उजळून ज्योती, ओवाळीन आरती

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ते माझे घर

ते माझे घर, ते माझे घर
जगावेगळे असेल सुंदर ॥ ध्रु ॥

नक्षिदार अति दार तयाचे
शिल्प त्यावर बुद्धकलेचे
चक्रे, वेली, मूर्ति मनोहर ॥ १ ॥

अंगणि कमलाकृति कारंजे
वरी अप्सरा एक विराजे
झरतिल धारा ओलेतीवर ॥ २ ॥

अकार मोठा, तरिही बैठा
आंतुन वेरुळ आणि अजंठा
वरी लालसर असेल छप्पर ॥ ३ ॥

पागोड्यांची शिखरे वळती
तशी छप्परे छपरावरती
कॄष्णकमळिच्या वेली त्यांवर ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

विकत घेतला श्याम

नाही खर्चिली कवडीदमडि, नाही वेचला दाम
बाइ, मी विकत घेतला श्याम ॥ ध्रु ॥

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम ॥ १ ॥

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संताघरचा
हाच तुक्याचा विठ्ठ्ल आणि दासाचा श्रीराम ॥ २ ॥

जितके मालक, तितकी नावे, ह्रूदये तितकी, याची गावे
कुणी न ओळखी तरीही, याला दीन, अनाथ, अनाम ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: